CSK ला मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूने अचनाक घेतली निवृत्ती

R Ashwin Retirement from IPL : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीगमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, भारताचा माजी खेळाडू आणि सीएसकेचा (CSK) स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) निवृत्तीची घोषणा केली आहे. एक्स वर पोस्ट करत आर. आश्विनने आयपीएलमधून निवृत्तीची माहिती दिली आहे. आर. आश्विनने डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
एक्सवर आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करत त्यांने भविष्यात विदेशी लीगमध्ये खेळणार असल्याची देखील माहिती दिली आहे. आर अश्विनने एक्स वर लिहिले की, “खास दिवस आणि म्हणूनच एक खास सुरुवात. असे म्हटले जाते की प्रत्येक टोकाची एक नवीन सुरुवात असते, आयपीएल क्रिकेटर म्हणून माझा वेळ आज संपतो, परंतु विविध लीगमध्ये खेळाचा शोध घेणारा म्हणून माझा वेळ आजपासून सुरू होतो. इतक्या वर्षांच्या अद्भुत आठवणी आणि नातेसंबंधांसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयपीएल आणि बीसीसीआय, जे त्यांनी मला आतापर्यंत दिले आहेत, मी सर्व फ्रँचायझी संघांचे आभार मानू इच्छितो. पुढे जे काही आहे त्याचा आनंद घेण्यासाठी आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी मी उत्सुक आहे.”
गेल्या हंगामात अश्विन चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता, पण त्याची कामगिरी चांगली नव्हती. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जने आर अश्विनला 9.75 कोटी रुपयांना खरेदी केले, परंतु चेन्नईच्या खेळपट्ट्यांवरही त्याची कामगिरी अपेक्षेनुसार नव्हती. नंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले. आश्विनने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज आहे. त्याने 221 सामन्यांमध्ये 187 विकेट्स घेतल्या आहेत.
मोठी बातमी, जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी
तर दुसरीकडे आर. अश्विनने आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी एकूण 9 सामने खेळले, जे पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर होते. या सामन्यांमध्ये त्याला फक्त 7 विकेट्स मिळाल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 9.12 होता.