ICC Test Ranking : रविचंद्रन अश्विन नंबर वन! आयसीसी क्रमवारीत भारताचा बोलबोला

ICC Test Ranking : रविचंद्रन अश्विन नंबर वन! आयसीसी क्रमवारीत भारताचा बोलबोला

ICC Test Ranking : टीम इंडियाचा (Team India)ऑफ स्पीनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)आयसीसी टेस्ट रॅंकिंगमधील टॉपचा गोलंदाज ठरला आहे. आयसीसीने (ICC)आज बुधवारी जारी केलेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये टीम इंडियाचा रविचंद्रन अश्विन अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. याचबरोबर टीम इंडियाच्या फलंदाजांनीही क्रमवारीमध्ये गरुडझेप घेतली आहे. या यादीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर यशस्वी जैस्वालनेही (Yashasvi Jaiswal)चांगली कामगिरी केली आहे.

इंडियन बॅंकेत 146 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 89 हजार रुपये पगार, आजचा करा अर्ज….

गोलंदाजांच्या यादीमध्ये रविचंद्रन अश्विनने जसप्रीत बुमराहला मागे टाकत सहाव्यांदा नंबर वनचा गोलंदाज ठरला आहे. नुकत्याच धर्मशाळामध्ये पार पडलेल्या कसोटी मालिकेत अश्विनने 500 विकेट घेण्याचा विक्रम केला केला.

अश्विनने आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात एकूण 9 विकेट घेऊन मोठा विक्रम केला. त्या पार्श्वभूमीवर रविचंद्रन अश्विनने जसप्रीत बुमराहला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे.

पोलीस पाटील, आशासेविकांच्या मानधनात मोठी वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

100 व्या कसोटी सामन्यामध्ये अश्विनने पहिल्या डावात 51 धावांमध्ये 4 बळी आणि दुसऱ्या डावामध्ये 77 धावा देऊन 5 फलंदाज बाद केले. भारताने हा सामना एक डाव आणि 62 धावांनी जिंकून मालिका 4-1 ने जिंकली होती.

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत टीम इंडियाचे तीन फलंदाज टॉप-10 मध्ये आहेत. त्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आयसीसी क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आला आहे.

तर दुसरं म्हणजे यशस्वी जयस्वालने आठव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. पण कारणास्तव इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर राहिलेला विराट आयसीसीच्या क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube