इंडियन बॅंकेत 146 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 89 हजार रुपये पगार, आजचा करा अर्ज….

इंडियन बॅंकेत 146 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 89 हजार रुपये पगार, आजचा करा अर्ज….

Indian Bank Recruitment 2024 : अनेकांना बँकेत नोकरी (Bank job) करण्याची इच्छा असते. मात्र, या स्पर्धेच्या युगात मनासारखी नोकरी मिळवणं हे फार कठीण आहे. दरम्यान, तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे इंडियन (Indian Bank) बँक अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officer)पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण १४६ जागा भरण्यासाठी बॅंकेने अधिसूचना जारी केली. दरम्यान, इंडियन बँक अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी (SO) पदांसाठी अर्ज कसा करावा? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

राहुल गांधी महाराष्ट्रात येताच काँग्रेसला भगदाड; भाजपाचा झेंडा हाती घेणारे पद्माकर वळवी कोण ? 

इंडियन बँकेच्या भरतीसाठी तुम्ही 1 एप्रिल 2024 किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकता. महत्वाची बाब अशी की, उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंतच आपले अर्ज सादर करणं आवश्यक आहे. कारण, उशीरा आलेले किंवा चुकीचे वा अर्धवट माहिती असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

पदाचे नाव-
इंडियन बँक अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांची संख्या –
स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी एकूण 146 रिक्त जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता –
पदाच्या आवश्यकतेनुसार, शैक्षणिक पात्रता बॅचलर डिग्री / B.E / B.Tech / CA / MBA / ICWA / CFA / PG पदवी असावी.

Electoral Bonds Case : SBI कडून प्रतिज्ञापत्र अन् महत्त्वाची आकडेवारी सुप्रीम कोर्टात सादर 

वय श्रेणी –
स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी पात्र उमेदवारांचे वय 22 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.

अर्ज प्रक्रिया –
स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाइट – https://www. indianbank.in/

सूचना –
https://www. Indianbank.in/wp-content/uploads/2024/03/Detailed-advertisement-for-Recruitment-of-Specialist-Officers-2024.pdf

पगार:
पगार 36,000 ते 89,890 रुपये असेल.

अर्ज फी –
सामान्य – रु १०००/-
SC/ST/PWBD – रु.175/-

निवड कशी होईल?

एकतर निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल किंवा ऑनलाइन चाचणी होईल आणि नंतर मुलाखत घेतली जाईल. याबाबतची सविस्तर माहिती काही दिवसांत समोर येईल.

अर्ज कसा करायचा?
https://ibpsonline.ibps.in/ibsofebr24/ या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच १ एप्रिलपूर्वी सबमिट करणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज अपात्र ठरविला जाईल
महत्वाचं म्हमजे, अर्ज करण्यापूर्वी वरील सूचना काळजीपूर्वक वाचा.
अर्ज भरतांना उमेदवारांनी योग्य ती कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
शेवटी अर्जाची फी भरावी.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube