Prithvi Shaw : मुंबईत क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या गाडीवर हल्ला

मुंबई :  भारतीय क्रिकेट संघाचा ( Indian Cricket )  युवा फलंदाज पृथ्वी शॉच्या ( Prithvi Shaw )  गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ही घटना मुंबईच्या ( Mumbai ) ओशिवारा परिसरात घडली आहे. यानंतर पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पृथ्वी आपल्या मित्रांसमवेत गाडीतून चालला होता. तेव्हा ही घटना घडली आहे. Oshiwara Police has […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (23)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (23)

मुंबई :  भारतीय क्रिकेट संघाचा ( Indian Cricket )  युवा फलंदाज पृथ्वी शॉच्या ( Prithvi Shaw )  गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ही घटना मुंबईच्या ( Mumbai ) ओशिवारा परिसरात घडली आहे. यानंतर पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पृथ्वी आपल्या मित्रांसमवेत गाडीतून चालला होता. तेव्हा ही घटना घडली आहे.

मुंबईमध्ये पृथ्वी आपल्या मित्रांसमवेत गाडीतून चालला होता. यावेळी काही जण त्याच्या गाडीजवळ आले व त्यांनी पृथ्वीसमवेत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. पृथ्वीने त्या लोकांना सेल्फी काढणयासाठी नकार दिला. यानंतर मात्र ते लोक पृथ्वीवर रागावले.  त्यांनी पृथ्वीच्या गाडीवर दगडफेक केली. यात पृथ्वी थोडक्यात बचावला आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही.

याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पृथ्वी हा गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणामुळे चर्चेत होता. 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन्स डे च्या दिवशी पृथ्वीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्री निधी तापडियासोबतचा एक फोटो शेअर केला होता. यावर त्याने निधीचा उल्लेख पत्नी असा केला होता. पण काही वेळातच त्याने तो फोटो डिलीट केला. यावर स्पष्टीकरण देताना, हा फोटो कोणीतरी ए़डिट केला आहे, असे त्याने सांगितले. तसेच इंस्टाग्रामवर पोस्ट न केलेल्या गोष्टी दाखवल्या जात आहेत, असेही त्याने सांगितले. दरम्यान अनेक दिवसांपासून निधी व पृथ्वीच्या नात्याविषयी सोशल मीडियावर चर्चा आहे.

Exit mobile version