Chinchwad Bypoll : कलाटेंच्या उमेदवारीबाबत काय घडलं… सुनील शेळकेंनी सगळंच सांगून टाकलं!

Chinchwad Bypoll : कलाटेंच्या उमेदवारीबाबत काय घडलं… सुनील शेळकेंनी सगळंच सांगून टाकलं!

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) राहुल कलाटे (Rahul Kalate) हे महाविकास आघाडीतून (MVA) उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक होते. ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वच कार्यकर्त्यांची अशी भावना होती की ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. त्यामुळे बाहेरील कोणत्याही उमेदवाराला तिकीट न देता पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांला या पोटनिवडणुकीत संधी मिळायला हवी. अशी पक्षातील प्रत्येकाची मागणी होती. राहुल कलाटे विषयी अनेक जणांचे मत नकारात्मक होते. त्यामुळे ही बाब चिंचवड विधानसभा पक्षाचा निरीक्षक या नात्याने आमच्या वरिष्ठ नेत्यांना कळवली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी जाहीर केली, असे मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी सांगितले.

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होत असताना महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत आहे. बाकी बंडखोर किंवा अपक्ष उमेदवार अनेक आहेत. त्याचा काहीच फरक पडणार नाही असे सांगत आमदार सुनील शेळके म्हणाले की, चिंचवड विधानसभेत विकासाच्या जोरावरती आम्ही जनतेकडे मतदान रुपी आमच्या उमेदवाराला आशीर्वाद द्या, अशा पद्धतीने आम्ही आवाहन केले आहे. शेवटी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी मोलाचे योगदान देऊन या शहराला एका वेगळ्या उंची वरती नेण्याचे काम केलं आहे. तोच विचार करून चिंचवड विधानसभेतील जनता विकास कामांना प्राधान्य देईल. हा मला विश्वास आहे.


सुनील शेळके म्हणाले की, राहुल कलाटे असं म्हणतात की माझ्यावर अन्याय झाला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत माझं नाव होते असे सांगत त्यांनी माझ्यावर टीका केली. लोकनायक म्हणवणाऱ्यांना जनतेची भावना कळाली का, अशी त्यांनी टीका केली. परंतु, मी सांगतो की, गेल्या अनेक वर्षापासून पक्ष अडचणीचा असताना देखील पक्षाला साथ देणाऱ्या कार्यकर्त्याला आपण संधी दिली पाहिजे. अशी पक्षातील प्रत्येकाची भावना होती. तर राहुल कलाटे यांच्या गेल्या काही वर्षातील प्रवास पाहता त्यांच्यावर कोणाचाच विश्वास कलाटे या व्यक्तीवर दिसत नव्हता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही बाब लक्षात घेऊन निर्णय दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube