Download App

Prithvi Shaw : धावांचा पाऊस पाडणारा पृथ्वी शॉ वनडे कपमधून बाहेर

  • Written By: Last Updated:

Prithvi Shaw : रॉयल लंडन वनडे कपमध्ये धावांचा पाऊस पाडणारा भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ हा जायबंदी झाला आहे. गुडघ्याला दुखापत झाल्याने तो या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तो नॉर्थेम्पटनशायर या क्लबकडून खेळत होता. या क्लबला आता मोठा झटका बसला आहे. या स्पर्धेत तो केवळ चार सामने खेळला आहे.

23 वर्षीय पृथ्वी हा डरहमविरोधातील सामन्यात क्षेत्ररण करत असताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर असून, यातून तंदुरुस्त होण्यासाठी शॉ याला एक महिना कालावधी लागणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यामुळे नार्थेम्पटनाशरमधून संघातून त्याला हटविण्यात आले आहे.

VIDEO: विमानाचा भीषण अपघात, दहा ठार; कसा झाला अपघात पाहा ?

या संघाकडून खेळताना त्याने चार सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. या सामन्यांमध्ये शॉने 429 धावा कुठल्या आहेत. तर समरसेटविरोधात सामन्यात त्याने 244 धावा करत एका विक्रमाची नोंद केली आहे. या सामन्यात जबरदस्त खेळूनही शॉ हा जोरदार ट्रोल झाला होता. पृथ्वीच्या वाढत्या वजनावरून त्याला ट्रोल करून हिणविण्यात आले होते. तर काहींनी 23 वर्षीय काका असे ट्वीट केले होते.

बीडनंतर आता जळगाव, पुणे, कोल्हापुरात राष्ट्रवादीची तोफ धडाडणार!

शॉ या स्पर्धेतून बाहेर पडल्याबाबत या संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉन सॅडलर म्हणाले, पृथ्वी शॉ या उर्वरित स्पर्धेत खेळणार नसल्याने खुप निराश झालो आहेत. चार सामन्यांत पृथ्वीने एक वेगळी छाप सोडली होती. खेळाबरोबर ड्रेसिंग रुममध्येही तो प्रभाव टाकत होता. त्यामुळे त्याची अनुपस्थिती आम्हाला जाणविणार आहे.

या दुखापतीतून शॉ बरा झाल्यानंतर भारतात येऊन देशांतर्गत क्रिकेटमधून खेळणार आहे. तर आयपीएलमध्ये तो चांगले प्रदर्शन करून तो पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Tags

follow us