VIDEO: विमानाचा भीषण अपघात, दहा ठार; कसा झाला अपघात पाहा ?

  • Written By: Published:
Malaysia.JPG Air Craft

Malaysia air crash: मलेशियामध्ये भीषण विमान अपघात झाला आहे. यात दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. क्वालालंपूर शहरातील उत्तर भागात एक्स्प्रेसवर हा अपघात झाला आहे. चॉर्टर विमानाला हा अपघात झाला आहे. या विमानामध्ये सहा प्रवासी, दोन क्रू सदस्य यांचा मध्ये झाला आहे. तर रस्त्यावरील दोन वाहनांतील दोघे असे दहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या विमानामध्ये बिघाड झाल्यानंतर हे विमान क्वालांलपूर शहरातील हायवेवर उतरविण्यात आले. परंतु रस्त्यावर रहदारी सुरू होती. हे विमान उतरविल्यानंतर ते एक मोटारसायकल, एका कारला धडकले. या दोन्ही वाहनात एक-एक जण प्रवास करत होते. त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांचे मृतदेह स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत. हा अपघात कसा घडला आहे, याबाबत वाहतूक मंत्र्यालयाने चौकशीची आदेश दिले आहेत. अपघात स्थळावरील अपघाताचे फोटो, व्हिडिओ आता समोर आले आहेत.

बीडनंतर आता जळगाव, पुणे, कोल्हापुरात राष्ट्रवादीची तोफ धडाडणार!

या विमाने लँगकावी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतले होते. ते सुलतान अब्दुल अजीत शाह विमानतळावर उतरणार होते. परंतु या विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे.
या विमानाचा येथील दुपारी 2.47 वाजता सुबांग एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरशी पहिला संपर्क साधला. त्याला लँडिंग क्लिअरन्ससाठी दुपारी 2.48 ची वेळ देण्यात आली होती. हे विमान अब्दुल अजीत शाह विमानतळावर जवळ आले होते.

‘एक ना एक दिवस शरद पवार मोदींचंच नेतृत्व..,’; चंद्रशेखर बावनकुळेंचा उपरोधिक टोला

दुपारी 2. 51 वाजत विमानतळाच्या टॉवरवरील कर्मचाऱ्यांना अपघातस्थळावरून धूर निघताना दिसला. त्यानंतर विमानाचा अपघात झाल्याचे समोर आले. हे विमान तातडीने हायवेवर उतरत असताना कार आणि मोटारसायकलला धडकले. दोन्ही वाहनांमध्ये प्रत्येकी एक जण होता. फॉरेन्सिक कर्मचारी अवशेष गोळा करत आहेत. त्यांना पोस्टमॉर्टम तपासणी आणि ओळख प्रक्रियेसाठी क्लांग येथील तेंगकू अँपुआन रहीमा हॉस्पिटलमध्ये आणले जाईल, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Tags

follow us