‘एक ना एक दिवस शरद पवार मोदींचंच नेतृत्व..,’; चंद्रशेखर बावनकुळेंचा उपरोधिक टोला

‘एक ना एक दिवस शरद पवार मोदींचंच नेतृत्व..,’; चंद्रशेखर बावनकुळेंचा उपरोधिक टोला

Chandrashekhar Bawankule Vs Sharad Pawar : शरद पवार(Sharad Pawar) एक दिवस मोदींचं नेतृत्व मान्य करणार असल्याचा उपरोधिक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला आहे. बीडमध्ये आज राष्ट्रवादीच्या सभेत स्वाभिमानी सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत टीका केलीयं. त्यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे; पवारांचं वय काढणाऱ्या अजितदादांना सलगर भिडल्या

बावनकुळे म्हणाले, पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन लोकं भेटले तर त्याला राजकीय भेट समजू नये. एका काळ असा येणार आहे की, संपूर्ण भारत देश मोदींच्या नेतृत्वात सामोरं जाणार असून शरद पवारही एक दिवस मोदींचं नेतृत्व मान्य करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

“जोशीची बायको पॉर्नस्टार सारखी दिसतीय…” वासनांध तरुणाचा सोसायटीतील 140 जणांना मेल

तसेच आज शरद पवार मोदीजींचे नेतृत्व मान्यता करीत नसले तरी काळ बदलतो, पवार एक ना एक दिवस विचार करतील की मोदींच्याच नेतृत्वात देश पुढे जाऊ शकतो. त्यामुळे शरद पवारांमध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल, असा मला विश्वास असल्याचंही बावनकुळे म्हणाले आहेत. आम्ही जोर जबरदस्ती करू शकत नाही, त्यांचा प्रदीर्घ अनुभवातून मोदीजींबद्दल कळेल आणि त्यादिवशी मोदीजींना साथ देईल, असंही ते म्हणाले आहेत.

अभिनेत्री झरीन खान रुग्णालयात दाखल, ‘या’ आजाराची लागण झाल्यानं चाहते चिंतेत

अजित पवार यांनी भाजपाला राष्ट्र निर्माणासाठी पाठिंबा दिला आहे. मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी अजित पवार हे सरकारमध्ये आले आहेत. शिंदेंच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस, अजित पवार राज्यभर फिरत आहेत. आज शिर्डीत ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून हजारो लोकांना फायदा मिळत आहे. काही लोकं सरकारच्या अशा कामामुळे विचलित झाले असल्याचीही टीका बावनकुळेंनी केली आहे.

दरम्यान, आमदाराच्या पोटी आमदार ही भूमिका नसली पाहिजे, जर आमदाराच्या मुलात क्षमता असेल तर उमेदवारी दिली पाहिजे, नाही तर नको. पंतप्रधानांची भूमिका योग्यच म्हणावी लागेल. हे भाजपाला मान्य असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube