बीडनंतर आता जळगाव, पुणे, कोल्हापुरात शरद पवारांची तोफ धडाडणार!

बीडनंतर आता जळगाव, पुणे, कोल्हापुरात शरद पवारांची तोफ धडाडणार!

बीडच्या स्वाभिमानी सभेनंतर आता शरद पवार यांची पुढील ‘स्वाभिमान सभा’ 4 सप्टेंबरला जळगाव जिल्ह्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीत अजित पवारांनी उभी फुट पाडून भाजपसोबत घरोबा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनासाठी पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरले आहेत.

गुजरात खालसा करण्याची जबाबदारी पुन्हा मराठी माणसावर; वासनिकांकडे मोठी जबाबदारी

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात घोषणा केली होती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवारांनी नाशिकच्या येवल्यात पहिल्यांदा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर काल छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांसह अजित पवार गटावर जोरदार टीकास्त्र सोडल्याचं दिसून आले आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगरनंतर आज राष्ट्रवादीची पहिली स्वाभिमानी सभा पार पडली.

CM Eknath Shinde : सरकार पडेल म्हणणाऱ्यांचे ज्योतिषी संपले; अजित पवारच इकडं आले; शिंदेंचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. म्हणूनच, शरद पवारांनी मराठवाड्यातील पहिली स्वाभिमान सभा बीडमध्ये ठेवली आहे. त्यानंतर आता जळगावात राष्ट्रवादीची तोफ धडाडणार आहे. जळगावमधील सत्ताधारी पक्षांना राष्ट्रवादीचे नेते घाम फोडणार असल्याचं बोललं जात आहे. जळगावच्या सभेनंतर शरद पवार पुणे, कोल्हापुर जिल्ह्यांत सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सभेच्या माध्यमातून शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भाजप, शिंदे गटासह अजित पवार गटावर टीकेची तोफ डागण्यात येत आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube