Download App

आधी व्हिसा रद्द अन् आता पाकिस्तानवर ‘क्रिकेट स्ट्राईक’, भारतात PSL चे टेलिकास्ट बंद

PSL 2025 : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारत सरकारकडून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

  • Written By: Last Updated:

PSL 2025 : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारत सरकारकडून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. भारताने पाकिस्तानवर पाच निर्बंध घातले आहे. त्यापैकी एक म्हणजे भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपूर्वी देश सोडण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहे. तर आता पाकिस्तानच्या (Pakistan) क्रिकेटवर देखील भारताकडून कारवाई करण्यात येत आहे. सध्या पाकिस्तानची टी-20 लीग पाकिस्तान सुपर लीग (PSL 2025) सुरु असून याचा प्रसारण भारतात देखील होत होता मात्र आता भारतात याला प्रसारित करणाऱ्या कंपनीने यापुढे याला प्रसारित न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानची टी-20 लीग पाकिस्तान सुपर लीगचे सामने भारतात ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म फॅनकोडवर दाखवण्यात येत होते मात्र ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म फॅनकोडने पाकिस्तान सुपर लीग सामन्यांचे स्ट्रीमिंग वेळापत्रक पूर्णपणे काढून टाकल्याने भारतात यापुढे ही स्पर्धा प्रसारीत करण्यात येणार नाही असे सांगितले जात आहे. तर टीव्ही प्रसारणाचे हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. मात्र सोनी देखील पीएसएलचे सामने दाखवणार की नाही याबाबात सोनी स्पोर्ट्सकडून आतापर्यंत याबाबात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मंगळवारी 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा समोर आल्यानंतर केंद्र सरकारकडून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यात येतात आहे.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरकारने परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय जाहीर केले, ज्यात सिंधू पाणी करार निलंबित करणे, वाघा-अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क अंतर्गत व्हिसा सूट रद्द करणे यांचा समावेश आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय अन् सीमा हैदरही भारत सोडणार ? वकिलाने स्पष्टच सांगितलं

तर दुसरीकडे सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनाही लवकरात लवकर भारतात परतण्याचा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. याच बरोबर भारतीय नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचा सल्ला देखील भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

follow us