पाकिस्तान घाबरलं! भारताविरूद्ध 8 मोठे निर्णय…युद्धाची धमकी

पाकिस्तान घाबरलं! भारताविरूद्ध 8 मोठे निर्णय…युद्धाची धमकी

Pakistan Press Conference After India Action Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) सरकारने भारताच्या कारवाईबाबत मोठा निर्णय घेतलाय. एनएससी बैठकीनंतर पाकिस्तान सरकारने पत्रकार परिषद (Pahalgam Terror Attack) घेतली. यादरम्यान सांगितलं की, भारताने पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी कारवाई केली आहे. भारताची (Pakistan India Relation) ही कृती बेकायदेशीर आहे. भारताने आमच्याविरुद्ध केलेल्या प्रत्येक कारवाईला आम्ही एक-एक करून प्रत्युत्तर दिलंय.

पाकिस्तानमध्ये भारतीय राजदूतांची संख्या कमी करण्यात आली आहे. भारतीय राजदूतांना 30 एप्रिलपर्यंत येथून परत यावे लागेल. भारतासाठी हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. भारताने अटारी सीमा बंद केली आहे, आम्ही वाघा सीमा देखील बंद करत (Pakistan Press Conference) आहोत. शीख यात्रेकरूंवर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. सिंधू पाणी कराराबद्दल पाकिस्तानने म्हटलंय की, आम्ही देखील करारांवर निर्बंध देखील लादू शकतो.

VIDEO : वडिलांवर गोळी झाडली, ‘ती’ माझ्या हाताला घासून गेली; संजय लेलेंच्या मुलाने सांगितला थरार

पाकिस्तानने शिमला करारातून माघार घेण्याची धमकी दिली. पाकिस्तानने म्हटलंय की, आम्ही भारतीयांना दिलेले व्हिसा रद्द केले आहेत. पाणी अडवणे हे युद्धाचे कृत्य आहे. आम्ही भारतासोबतचा सर्व व्यापार थांबवला आहे. एकंदरीत ही पाकिस्तानची कॉपी पेस्ट कृती आहे. भारताने जे काही केलंय, तेच पाकिस्तानने देखील केलं आहे.

कृष्णा आंधळे अजूनही फरार… दोन अधिकाऱ्यांची SIT मध्ये नियुक्ती, धनंजय देशमुख यांची माहिती

पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान भीतीच्या छायेत जगत आहे. पाकिस्तान सीमेवर लष्करी हालचाली तीव्र झाल्या आहेत. एअरबेसमध्ये तैनाती वाढल आहे. रावळपिंडी लाहोर येथे 18 विमाने पाठवण्यात आली. अरबी समुद्रात युद्ध सराव सुरू आहे. शाहबाज शरीफ यांनी एनएससीची बैठक बोलावली आहे. एअर चीफ मार्शल यांनी ऑपरेशन बेसला भेट दिली आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप आहे. बिहारमधील मधुबनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, दहशतीच्या सूत्रधारांचा कणा मोडला जाईल. मी प्रत्येक दहशतवाद्याची ओळख पटवीन. भारत प्रत्येक दहशतवाद्याला शोधून शिक्षा करेल. आम्ही दहशतीची भूमी पुसून टाकू. हा हल्ला निशस्त्र लोकांवर नव्हता तर तो भारताच्या आत्म्यावर हल्ला होता. ज्यांनी हल्ला केला, त्यांना कल्पनाही केली नसेल इतकी मोठी शिक्षा होईल, असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube