PV Sindhu : भारताची बॅडमिंटन मधील सुवर्णकन्या पी व्ही सिंधुने ( PV Sindhu ) नुकतेच माद्रिद स्पेन मास्टर्स या स्पर्धेमध्ये आपली वाटचाल कायम ठेवली आहे. तिने उपांत्य फेरीत प्रवेश करताना तैपेईच्या हुआंग यू हूनचा सरळ गेममध्ये पराभव केला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी संघर्ष करत असलेल्या सिंधूने हा सामना उगाच 36 मिनिटात 21 14 आणि 21 12 असं जिंकला आहे.
ट्रान्सजेंडर समुदायासाठी फूड ट्रकच्या उद्घाटनाला पोहोचला आयुष्मान, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…
त्यानंतर पुढच्या फेरीत आता सिंधूचा मुकाबला थायलंडची सुपानिदा केटथोंग किंवा जपानची नात्सुकी निदाइराच्यासोबत होणार आहे. गेल्या वर्षी देखील सिंधूने या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. मात्र ती विजयाला गवसणी घालू शकली नव्हती. यावेळी देखील सिंधू विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
Amruta Khanvilkar: ‘…म्हणून मला मास्टर्स करायचं, अभिनेत्रीने सांगितलं पुढचं पाऊल
या फेरीमध्ये सिंधू ने सुरुवातीच्या खेळात तीन शून्य अशी आघाडी घेतली मात्र त्यानंतर तिचा खेळ पुन्हा एकदा गडगडला त्यामुळे तिची आघाडी सात-सहाची झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा भरारी घेत सिंधुने 36 मिनिटात 21 14 आणि 21 12 असं जिंकला. उपांत्य फेरीत प्रवेश करताना तैपेईच्या हुआंग यू हूनचा सरळ गेममध्ये पराभव केला आहे.