Download App

रचिन रवींद्रची शतकी खेळी, बांगलादेशचा पराभव अन् पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमधून आऊट

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सहाव्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा  5 विकेट्सने पराभव केला आहे. बांगलादेशच्या

  • Written By: Last Updated:

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025 ) सहाव्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 5 विकेट्सने (NZvsBAN) पराभव केला आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केला होता. तर आता बांगलादेशचा पराभव करत या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.

तर दुसरीकडे बांगलादेशच्या या पराभवामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तानचा संघ देखील जवळपास बाहेर झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने (Rachin Ravindra) शानदार कामगिरी करत शतक झळकावले आहे. त्याने 105 चेंडूंमध्ये 112 धावा केल्या. या दरम्यान त्याने 12 चौकार आणि 1 षटकार मारला. तो या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचा पहिलाच सामना खेळत आहे. दुखापतीमुळे तो पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने कर्णधार नझमुल हसन शांतोच्या 77 धावांच्या आणि झाकेर अलीच्या 45 धावांच्या जोरावर 236 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली. शांतो आणि तन्जीद हसन यांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली होती मात्र त्यानंतर न्यूझीलंडने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्यात कमबॅक केला. न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेलने 4 विकेट्स घेत बांगलादेशला या सामन्यात बॅकफूटवर आणले.

आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात, “देशभक्तीचे खोटे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे खरे चेहरे उघड

 

follow us