Ranji Trophy 2024 : अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली मुंबईने रणजी ट्रॉफी 2024 च्या (Ranji Trophy 2024) उपांत्य सामन्यात तामिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव केला आहे. तामिळनाडूचा पराभव करून मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयात सर्वात मोठी भूमिका होती राहिली शार्दुल ठाकूरची (Shardul Thakur) अष्टपैलू कामगिरी. त्याने दमदार शतक आणि 4 विकेट घेतल्या होत्या. शार्दुलला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.
या सामन्यात तामिळनाडूने पहिल्या डावात 146 धावा केल्या होत्या आणि त्यानंतर शार्दुल ठाकूरचे शतक तसेच मुशीर शान आणि तनुष कोटियन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबई संघाने पहिल्या डावात 378 धावा केल्या. 232 धावांची मोठी आघाडी घेतली होती.
Saqib Saleem: साकिब सलीमच्या इंस्टाग्राम पोस्टनं चाहत्यांना केलं मोहित
यानंतर दुसऱ्या डावात तामिळनाडूची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. त्यांचा दूसरा डाव 162 धावांवर संपला आणि मुंबईने एक डाव आणि 70 धावांनी विजय मिळवला. मुंबई संघाने 48व्यांदा रणजी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई संघ 41 वेळा चॅम्पियन बनला आहे.
शार्दुल ठाकूर मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला
या सामन्यात मुंबई संघाच्या विजयाचा हिरो होता शार्दुल ठाकूर, त्याने पहिल्या डावात अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या संघासाठी शानदार शतक झळकावले आणि संघाची धावसंख्या मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावली. पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने 104 चेंडूत 4 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 109 धावांची शानदार खेळी केली.पहिल्या डावात त्याने 2 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावातही त्याने २ विकेट घेतल्या.
शिर्डी लोकसभेसाठी उत्कर्षा रुपवतेंनी फुंकले रणशिंग…