Ravindra Jadeja : माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करणं बंद करा; वडिलांच्या ‘त्या’ मुलाखतीवर भडकला जडेजा

Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) कुटुंबातील वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये अगोदर जडेजाचे वडिल अनिरूद्धसिंग जडेजा यांनी एका मुलाखतीमध्ये जडेजाची पत्नी रिबावा जडेजा (Rivaba Jadeja) हिच्यासह मुलावर देखील गंभीर आरोप केले. त्यावर आता जडेजा देखील चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळालं. तो म्हणाला की, माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करणं […]

Ravindra Jadeja : माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करणं बंद करा; वडिलांच्या 'त्या' मुलाखतीवर भडकला जडेजा

Ravindra Jadeja

Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) कुटुंबातील वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये अगोदर जडेजाचे वडिल अनिरूद्धसिंग जडेजा यांनी एका मुलाखतीमध्ये जडेजाची पत्नी रिबावा जडेजा (Rivaba Jadeja) हिच्यासह मुलावर देखील गंभीर आरोप केले. त्यावर आता जडेजा देखील चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळालं. तो म्हणाला की, माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करणं बंद करा. काय आहे हे नेमकं प्रकरण पाहुयात…

PM मोदींच्या आठ खासदारांसोबत स्पेशल लंच… पाकिस्तानचा किस्सा केला शेअर

रवींद्र जडेजा याचे वडील अनिरुद्धसिंह जडेजा यांनी नुकतच दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अनिरुद्ध सिंह यांनी आपल्या कुटुंबामध्ये दुरावा निर्माण करण्याचा आरोप जडेजाची पत्नी रीवाबा हिच्यावर लावला. तसेच ते म्हटले की, लग्नानंतर त्यांचा मुलगा खूप बदलला आहे. त्यामुळे जर मी त्याचं लग्न केलं नसतं. तसेच त्याला क्रिकेटरही होऊ दिलं नसतं. तर खूप चांगलं झालं असतं. तसेच एकाच शहरात राहून देखील त्यांचा आणि आपला संपर्क नसतो. असं रवींद्रचे वडील म्हटले होते.

Pune : कोलकात्यात भेट, पुण्यात प्रेम अन् गुवाहटीत खून : लव्ह ट्रँगलने घेतला बड्या उद्योजकाचा बळी

त्यानंतर वडिलांच्या या मुलाखतीवर रवींद्र जडेजाने संतप्त प्रतिक्रिया देणारं एक ट्विट केलं. ज्यामध्ये तो म्हटला की, मला देखील याबद्दल बरच काही बोलायचं आहे. पण मी सार्वजनिक ठिकाणी या विषयावर बोलणार नाही. ही मुलाखत पूर्णपणे स्क्रिप्टेड होती. तिच्याकडे दुर्लक्ष केले जावं. तसेच माझ्या पत्नीची प्रतिमा मलीन करणं बंद करा. असं रवींद्र जडेजा म्हणाला.

ट्वीटमध्ये जडेजाने गुजरातीमध्ये लिहिलं आहे की, भास्करला देण्यात आलेली मुलाखत निरर्थक आणि खोटी आहे. त्यामध्ये एकतर्फी माहिती देण्यात आले आहे. तिचं मी खंडन करतो. माझ्या पत्नीची प्रतिमा मलीन करण्याचा हा चुकीचा प्रयत्न निंदनीय आहे. मला देखील यावर खूप काही बोलायचे आहे. पण या गोष्टी सार्वजनिक रित्या न बोललेलं बरं.

तर जाडेजाची पत्नी रीवाबा जाडेजा तिच्याबद्दल सांगायचं झालं. तर भारतीय जनता पक्षाचे नेत्या आहेत. तसेच सध्या गुजरातमधील जामनगर या मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार देखील झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये जडेजाची बहीण असलेल्या नयनाबा यांना पराभूत करत रीवाबाने हा विजय मिळवला होता.

Exit mobile version