टीम इंडियाला चिअर करण्यासाठी पोहोचल्या अनुष्का-रितिका आणि रिवाबा, उर्वशीचा ग्लॅमर तडका
World Cup 2023 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषक सामना खेळला जात आहे. हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी देशभरातील क्रिकेट चाहते अहमदाबादला पोहोचले आहेत. याशिवाय भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नीही सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आल्या आहेत. यामध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका (Ritika) सजदेह, विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा (Rivaba) यांचा समावेश आहे. या तिघीही एकत्र बसलेल्या दिसून आल्या.
उर्वशीने लावला ग्लॅमरचा तडका
याशिवाय भारत-पाकिस्तान सामन्यालाही ग्लॅमरचा टच मिळाला आहे कारण बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला टीम इंडियाला चिअर करण्यासाठी आली आहे. उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) स्टेडियममध्ये ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. उर्वशीने इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये उर्वशी ब्लू कलरच्या हॉट लुकमध्ये दिसत आहे. उर्वशीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे सेलिब्रिटीही स्टेडियममध्ये उपस्थित
हा सामना पाहण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटींशिवाय अनेक दिग्गज मंडळीही आले आहेत. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सामना पाहण्यासाठी आला आहे. दिनेश कार्तिकही स्टेडियममध्ये आहे. याशिवाय गौतम गंभीर, इरफान पठाण, सुनील गावस्कर, रवी शास्त्री हे ब्रॉडकास्टिंग टीमचा भाग आहेत. गायक अरिजित सिंगही प्रेक्षकांमध्ये बसून टीम इंडियाला चिअर करत आहे.
Virat Kohli: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराटने घातली भलतीच जर्सी, नेमकं काय घडलं?
World Cup 2023 : हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानची दाणादाण, 191 धावांवर ऑलआउट
पाकिस्तानची दाणादाण
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.चांगली सुरुवात झाल्यानंतरही पाकिस्तान 42.5 षटकात 191 धावांवर ऑलआउट झाला आहे. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 50 धावांचे योगदान दिले. त्यानंतर मोहमद रिझवाने 49 धावा केल्या. त्यानंतर एकाही पाकिस्तानच्या खेळाडूला भारतीय गोलंदाजांनी खेळपट्टीवर जास्व वेळ टिकून दिले नाही. भारताकडून सिराज, बुमराह, कुलदीप, हार्दिक आणि जडेजाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भारतीय संघापुढे 192 धावांचे आव्हान आहे.