सलग दुसऱ्यांदा IPL विजेतेपद जिंकत RCB ची ऐतिहासिक कामगिरी; गेल्या वर्षीच्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर यंदा व्हिक्ट्री परेड होणार?

RCB's wins IPL Will be victory parade RCB ने IPL मध्ये ऐतिहसिक कामगिरी केली. मात्र भव्य विजयी मिरवणूक निघण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

RCB's Wins IPL Will Be Victory Parade

RCB's Wins IPL Will Be Victory Parade

RCB’s historic achievement of winning IPL title Will be victory parade this year after last year’s stampede : IPL 2026 चे विजेतेपद पटकावत इतिहास रचणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या चाहत्यांमध्ये सध्या उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा एकतर्फी पराभव करून सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकणाऱ्या RCB ने आता IPL इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.

महागाईची आग भडकली! इंधन दरवाढीनंतर आता व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्याने सर्वसामान्यांवर अप्रत्यक्ष भार

मात्र या ऐतिहासिक यशानंतरही बंगळुरूमध्ये भव्य विजयी मिरवणूक निघण्याची शक्यता सध्या अत्यंत कमी असल्याचे दिसत आहे.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर मात करत RCB IPL च्या 19 वर्षांच्या इतिहासात सलग दोन विजेतेपदे जिंकणारी केवळ तिसरी संघ ठरली आहे. यापूर्वी हा पराक्रम फक्त चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांनीच केला होता.

विजयी मिरवणूक होणार नाही?

या मोठ्या यशानंतर साधारणपणे संघांसाठी भव्य रोड शो आणि विजय मिरवणुकांचे आयोजन केले जाते. मात्र अहमदाबादमध्ये विजेतेपद जिंकल्यानंतर RCB ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनातून यंदाचे सेलिब्रेशन मर्यादित ठेवण्याचे संकेत मिळाले आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, RCB संघाने 1 जून रोजी बंगळुरूला परतण्याचाही कोणताही तातडीचा कार्यक्रम आखलेला नाही. संपूर्ण संघ सध्या अहमदाबादमध्येच मुक्काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ज्येष्ठ शास्त्रीय गायक, अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

फ्रँचायझीने सोशल मीडियावर भावनिक संदेश शेअर करत चाहत्यांना जबाबदारीने आनंद साजरा करण्याचे आवाहन केले आहे. RCB ने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “ही रात्र खरोखरच अविस्मरणीय होती. हा अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे. RCB परिवारातील प्रत्येक सदस्याचे अभिनंदन. हा विजय तुमचा आहे. उत्सवाला सुरुवात होत असताना तो जबाबदारीने साजरा करूया. आपल्या कुटुंबीयांसोबत आणि जवळच्या व्यक्तींसोबत हा आनंदाचा क्षण अनुभवणे हाच साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.” पुढे संघाने म्हटले, “या सुवर्णक्षणांच्या आठवणी पुन्हा जगा आणि घरच्या सुरक्षित वातावरणात या विजयाचा आनंद घ्या. पुढील वर्षी पुन्हा स्टेडियममध्ये भेटूया, 12th Man Army. तोपर्यंत आनंद वाटत राहा आणि आमच्यावरचे प्रेम असेच कायम ठेवा.”

गेल्या वर्षीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय?

RCB चे हे निवेदन अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा फ्रँचायझी गेल्या वर्षी घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच संघाने चाहत्यांना घरात राहून सुरक्षितपणे विजयाचा आनंद साजरा करण्याचा सल्ला दिल्याचे मानले जात आहे.

नोकरी, पैसा आणि प्रेम यात काय बदल होणार? सर्व 12 राशींचं राशिभविष्य वाचा

दरम्यान, अंतिम सामन्यात पराभव स्वीकारलेल्या गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनाही एक धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले. सामना संपल्यानंतर हॉटेलकडे परतत असताना संघाच्या बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे बसमध्ये धूर पसरू लागला आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने संघ व्यवस्थापनाने तत्काळ सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला सुरक्षितपणे बाहेर काढले. काही वेळ सर्वजण रस्त्याच्या कडेला थांबले होते. त्यानंतर पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली आणि सर्वांना सुरक्षितपणे हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आले.

Exit mobile version