ममतांना टक्कर देणारे सुवेंदू अधिकारी की आरएसएसमधून आलेले घोष; कोण चालवणार बंगालची गादी?

West Bengal CM बंगालमध्ये भाजपचा विजय नक्की आहे. त्यामुळे आता भाजपमधील मुख्यमंत्रीपदासाठी कोणती नावं चर्चेत आहेत? जाणून घ्या सविस्तर...

West Bengal Assembly Election

West Bengal Assembly Election Result BJP towards Win Suvendu Adhikari or Dilip Ghosh who will CM : पाच राज्यांतील निवडणुकांसोबतच आज पश्चिम बंगालमध्ये देखील 293 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीपासूनच समोर येणारे कल इतके चढ उतार दाखवत आहेत की, संपूर्ण चित्र एखाद्या थरारक चित्रपटाच्या क्लायमॅक्ससारखे वाटत आहे. कधी भाजपची भगवा लाट आघाडी घेताना दिसते, तर कधी ममता बॅनर्जी यांचा खेळा पुन्हा त्यांना शर्यतीत पुढे आणताना दिसतो. मात्र बंगालमध्ये भाजपचा विजय नक्की आहे. त्यामुळे आता भाजपमधील मुख्यमंत्रीपदासाठी कोणती नावं चर्चेत आहेत? जाणून घ्या सविस्तर…

तो नराधम जिवंत राहणार नाही! नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा शब्द

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेस मात्र त्यांचा पिछाडीवर आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप पहिल्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झाला आहे. यामध्ये आता विजयाच्या चर्चांदरम्यानच भाजपमधील मुख्यमंत्र्यांच्या पदाच्या शर्यतीत असलेल्या लोकांच्या नावांची चर्चा सुरू झाल्या आहेत.

सुवेंदू अधिकारी –

सुवेंदूअधिकारी हे पश्चिम बंगालमधील भाजपचे फायर ब्रँड नेते आहेत. ते सध्या नंदिग्राम मतदार संघातून आमदार आहेत. तर यावेळी त्यांनी नंदिग्राम आणि भवानीपूर दोन्हीही जागांवरून निवडणूक लढली आहे. भवानीपूर या ठिकाणी स्वतः ममता बॅनर्जींना त्यांनी काटे की टक्कर दिली आहे. विशेष म्हणजे अधिकारी हे मूळचे तृणमूल काँग्रेसचे आहेत भाजपमध्ये ते 2021 च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी आले. तेव्हा त्यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना हरवलं होतं. तर यावेळी भवानीपूरमधून देखील उभे होते. त्यामुळे या मजबूत नेत्याचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे.

दिलीप घोष –

दिलीप घोष हे पश्चिम बंगाल भाजपमधील दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. ते पश्चिम बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. घोष यांनी त्यांचा राजकीय प्रवास आरएसएस प्रचारक म्हणून सुरू केलेला आहे. 2014 मध्ये ते भाजपामध्ये आले आणि 2015 मध्ये पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष झाले. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी खरगपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकले, तर 2019 मध्ये मेदिनीपूर मधून ते लोकसभेवर गेले आहेत. तर यावेळी देखील ते खरगपूरचे उमेदवार होते. त्यामुळे अधिकारी यांच्यानंतर घोष हे देखील मुख्यमंत्री पदाचे प्रबळ उमेदवार आहेत.

follow us