Download App

IND vs NED: रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकांच शतक, दिग्गजांच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Rohit Sharma Record: रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याद्वारे एक अतिशय खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक पूर्ण करत अर्धशतकांचे शतक केले आहे. असा पराक्रम करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरला. नेदरलँड्सविरुद्ध टीमला तडाखेबाज सुरुवात करून देताना हिटमॅनने 54 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली.

रोहित शर्माचे वनडे क्रिकेटमधील हे 55 वे अर्धशतक होते. त्याने कसोटीत 16 अर्धशतकं आणि आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 29 अर्धशतकं झळकावली आहेत. अशाप्रकारे रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले अर्धशतकांचे शतक पूर्ण केले. रोहित शर्मापूर्वी सचिन तेंडुलकर (164), विराट कोहली (136), राहुल द्रविड (146), महेंद्रसिंग धोनी (108) आणि सौरव गांगुली (107) यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा आकडा पार केला आहे.

World Cup 2023 : रोहित, गिल, कोहलीच्या फटकेबाजीनंतर अय्यर, केएलचा तुफानी शतकांचा धमका !

विश्वचषकात सर्वाधिक 50+ धावा करणारा तिसरा खेळाडू
नेदरलँड्सविरुद्धच्या या अर्धशतकासह, रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक 50+ धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला. या स्पर्धेत सर्वाधिक 50+ धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, त्याने हा आकडा 21 वेळा ओलांडला आहे. हा आकडा 14 वेळा पार करून विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर रोहित शर्मा आणि बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन हे तिसरे फलंदाज आहेत ज्यांनी 13-13 वेळा 50+ धावा केल्या आहेत.

World Cup : 32 वर्षांपूर्वी जिथे मिळाली नवसंजीवनी तिथेच ऐतिहासिक संधी : आफ्रिकेकडे जगाचे लक्ष

विश्वचषकात दोनदा 500+ धावा करणारा पहिला फलंदाज
सलग दोन एकदिवसीय विश्वचषकामध्ये 500 हून अधिक धावा करणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू ठरला आहे. अर्धशतकासह रोहितने 9 सामन्यांच्या 9 डावात 55.89 च्या सरासरीने आणि 121.50 च्या स्ट्राइक रेटने 503 धावा केल्या आहेत. यापूर्वी 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत रोहित शर्माने 9 डावात 81 च्या सरासरीने आणि 98.33 च्या स्ट्राईक रेटने 648 धावा केल्या होत्या.

Tags

follow us