Download App

रोहित शर्माने षटकारांचा इतिहास रचला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकारांचा मानकरी

World Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या वनडे वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर, हिटमॅनने दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले आणि 5 षटकार मारून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आणि ख्रिस गेलचा विक्रम मोडला.

यानंतर, रोहित पाकिस्तानविरुद्धही चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आणि या सामन्यात त्याच्या डावात 3 षटकार मारून, तो वनडे फॉरमॅटमध्ये 300 षटकार मारणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला.

भारताकडून सर्वाधिक षटकार
रोहित शर्मा हा एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे आणि त्याने त्याच्या 254 व्या सामन्यात 300 षटकारांचा टप्पा गाठला. भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एमएस धोनी दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 229 षटकार ठोकले होते, तर सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 463 सामन्यांमध्ये 195 षटकार ठोकले आहेत.

रोहित शर्माकडून पाकिस्तानची धूलाई
वर्ल्ड कप 2023 चा 12 वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाने 22 व्या षटकात 156 धावांवर तिसरी विकेट गमावली. रोहित शर्मा अवघ्या 63 चेंडूत 86 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 6 षटकार आले. 22 षटकांनंतर भारताची धावसंख्या 3 विकेटवर 157 धावा आहे. विजयासाठी भारताला 192 धावांचे आव्हान आहे.

World Cup 2023 : हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानची दाणादाण, 191 धावांवर ऑलआउट

वनडेमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार
रोहित शर्मा – 303 षटकार (नाबाद)
एमएस धोनी – 229 षटकार
सचिन तेंडुलकर – 195 षटकार

Virat Kohli: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराटने घातली भलतीच जर्सी, नेमकं काय घडलं?

रोहित शर्माने ख्रिस गेलचा विक्रम मोडला
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकार मारणारा रोहित शर्मा निश्चितपणे जगातील तिसरा फलंदाज ठरला, परंतु त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात कमी डावात 300 षटकार मारण्याच्या बाबतीत तो ख्रिस गेलच्या पुढे गेला आहे. रोहितने 246 व्या एकदिवसीय डावात हा टप्पा गाठला, तर ख्रिस गेलने 282 डावात आणि शाहिद आफ्रिदीने 324 डावात 300 षटकार ठोकले.

कमी डावात 300 षटकार ठोकणारे फलंदाज
246 डाव – रोहित शर्मा
282 डाव – ख्रिस गेल
324 डाव – शाहिद आफ्रिदी

एकदिवसीय क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदीच्या नावावर सर्वाधिक षटकार आहेत
वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आजही पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे, ज्याने 398 वनडे सामन्यांमध्ये 351 षटकार ठोकले होते. ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 301 सामन्यांमध्ये 331 षटकार ठोकले आहेत, तर रोहित शर्माने 254 सामन्यांमध्ये 303 षटकार ठोकले आहेत.

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ‘लॅक्मे फॅशन वीक’ मधील अनोखा अंदाज पाहिलात का?

वनडेत सर्वाधिक षटकार
शाहिद आफ्रिदी – 351 षटकार
ख्रिस गेल – 331 षटकार
रोहित शर्मा – 303 षटकार

Tags

follow us