Rohit Sharma : आगामी होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) हाच भारतीय संघाचा कॅप्टन असणार का? त्याचबरोबर टीम इंडीयाचा कोच राहुल द्रविड याचा कार्यकाळ कधी पर्यंत असणार? दोन प्रश्नांची उत्सुकता सध्या क्रिकेट प्रेमींना लागलेली आहे. मात्र यावर भारतीय संघाच्या अफ्रिका दौऱ्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी दिली. ते मुंबईत डब्ल्यूपीएल लिलावामध्ये बोलत होते.
काय म्हणाले जय शाह?
रोहित शर्माच्या कर्णधार पदावर प्रश्न विचारला असता जय शाह म्हणाले की, रोहित शर्माच्या कर्णधार पदावर आता खुलासा करण्याची गरज आहे का? जूनमध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये रोहित शर्मा हाच भारतीय संघाचा कॅप्टन असणार का? हा प्रश्न जरी अनुत्तरीत असला तरी त्याअगोदर आयपीएल आणि अफगाणिस्तानविरूद्ध मालिका आहे. असं जय शाह म्हणाले. तर दुसरीकडे त्यांनी राहुल द्रविडच्या कार्यकाळावर देखील उत्तर दिलं आहे.
Mrunmayi Deshpande : मृण्मयीचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते फिदा
राहुल द्रविडच्या कार्यकाळावर बोलताना जय शाह म्हणाले की, नुकतंच झालेला विश्वचषक आणि अफ्रिका दौरा यामधील कालावधी अत्यंत कमी होता. त्यामुळे म इंडीयाचा कोच राहुल द्रविड याचा कार्यकाळ कधी पर्यंत असणार? हे ठरवता आलेले नाही. त्यामुळे जरी राहुल द्रविडच्या कार्यकाळाला मुदतवाढ दिली असली तरी देखील निश्चित कार्यकाळ ठरलेला नाही. तर दक्षिण अफ्रिका दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यावर चर्चा आणि निर्णय होणार आहे. अशी माहिती शाह यांनी दिली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना रविवारी 10 डिसेंबरला डर्बनमधील किंग्समीड येथे खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना सुरू होऊ शकला नाही. सततच्या पावसामुळे या सामन्याचा नाणेफेकही होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत हवामान आणि मैदानाची स्थिती लक्षात घेऊन पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पहिला T20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होणार होता. सामना साडेसात वाजता सुरू होणार होता. मात्र, बराच वेळ पाऊस पडत होता. त्यामुळे नाणेफेक वेळेवर होऊ शकली नाही. यानंतर पाऊस थांबण्याची बरीच प्रतीक्षा केली, मात्र पाऊस थांबला नाही आणि त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.