Download App

चुकीला माफी नाही; भारत-बांग्लादेश सामन्यापूर्वी रोहित शर्माला पुणे पोलिसांनी ठोठावला दंड

Rohit Sharma: भारत-बांग्लादेश सामना उद्या (गुरुवारी) पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणार आहे. यासाठी भारतीय टीम पुण्यातील मुक्कामी आहे. त्यापूर्वी भारतीय संघाचा सराव सुरु आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्माला पुणे पोलीसांनी दंड ठोठवला आहे. रोहित शर्मा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अतिशय वेगाने कार चालवत होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार रोहित शर्माविरुद्ध पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी तीन तीन चालान जारी केले आहे. भारत-बांग्लादेश सामन्यापूर्वी रोहित तीन-चार दिवसांची विश्रांती होती. दरम्यान तो कुटुंबाला भेटण्यासाठी मुंबईला गेला होता. कुटुंबाला भेटून पुण्याला येत असताना त्याने वाहतुकीचे नियम मोडले.

World Cup 2023: न्यूझीलंडचा विजयी चौकार, चेन्नईत अफगाणिस्तानचा धुव्वा

मुंबईहून पुण्याला येताना एक्स्प्रेस वेवर 200 किमी प्रतितास किंवा त्याहून अधिक वेगाने त्याने स्पोर्ट्स कार चालवली. त्यासाठी त्याला तीन चालानही बजावण्यात आले आहे मात्र या चालानपेक्षाही रोहित शर्माचा निष्काळजीपणा मोठा होता.

अधिका-यांनी सांगितले की, रोहित शर्माने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अतिशय वेगाने कार चालवली. या एक्स्प्रेस वेवर ताशी 100 किलोमीटर वेगाची मर्यादा आहे, मात्र रोहितच्या गाडीचा वेग यापेक्षा दुप्पट होता. एक्स्प्रेसवेवर ठिकठिकाणी अनेक कॅमेरे लावण्यात आले आहेत. रोहितकडे निळ्या रंगाची कार आहे. जिचा नंबर 0264 असा आहे.

नेदरलँडच्या उलटफेरनं वर्ल्डकपचं कॅलक्युलेशन बदलणार का? जाणून घ्या समीकरण

दरम्यान, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही वेगाचा शौकीन आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याचा कारचा भीषण अपघात झाला होता. तो त्याच्या आईला भेटण्यासाठी जात होता. या अपघातात पंत थोडक्यात वाचला होता. या दुर्घटनेला जवळपास एक वर्ष होत आलं तरी पंतला अद्याप टीम इंडियामध्ये पुनरागमन करता आले नाही.

Tags

follow us