World Cup 2023: गतविजेत्या इंग्लंडचा मोठा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर तब्बल 229 धावांनी विक्रमी विजय मिळविला आहे. गजविजेत्या इंग्लंडचे बलाढ्य फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 400 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 170 धावांत गारद झाला आहे. या पराभवाबरोबर आता इंग्लंडचा संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याच्या संकटात सापडला आहे.
इंग्लंड संघ आता गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आला आहे. इंग्लंड आतापर्यंत चार सामने खेळला आहे. त्यात केवळ बांग्लादेशविरुद्धच इंग्लंडला विजय मिळविता आला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत करत मोठा उलटफेर केला आहे. त्यानंतर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेकडून गतविजेता इंग्लंड पराभूत झाला. त्यामुळे गुणतालिकेत इंग्लंडचा संघ थेट नवव्या क्रमांकावर आला आहे.
SA vs ENG : गतविजेता इंग्लंड तोंडावर आपटला ! दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय
तर इंग्लंडचा रनरेटही -1.248 इतका आहे. तर इंग्लंडसमोर पुढच्या दोन सामन्यातही बलाढ्य संघ आहेत. 26 नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडचा सामना आहे. त्यानंतर 29 तारखेला भारताविरुध्द लखनौमध्ये लढत होणार आहे. दोन्ही ठिकाणच्या खेळपट्टा या फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहेत. फिरकीच्या जाळ्यात अडकून इंग्लंडचा एकही पराभव झाल्यास ते वर्ल्डकपमधून बाहेर होऊ शकतात.
World Cup 2023 : टीम इंडियासाठी थोडी खुशी, थोडा गम; बांग्लादेशला हरवूनही फायदा नाहीच
गुणतालिकेत न्यूझीलंड संघ हा पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाने आतापर्यंतचे चारही संघ जिंकले आहेत. त्यामुळे या संघाचे आठ गुण आहेत. तर भारतही चारही सामनेही जिंकून आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेने चार सामन्यात तीन सामने जिंकले आहेत. हा संघ सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
पाकिस्तानही चार सामने खेळला आहे. त्यात दोन विजय मिळविले आहे. तर दोन पराभव झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तान चार गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. बांगलादेश दोन गुणांसह सहाव्या, नेदरलँड्स दोन गुणांसह सातव्या, श्रीलंका दोन गुणांसह आठव्या, इंग्लंड दोन गुणांसह नवव्या आणि अफगाणिस्तान दोन गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेतील टॉपचे चार संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरणार आहेत.