SA vs ENG : गतविजेता इंग्लंड तोंडावर आपटला ! दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय
World Cup 2023 : गतविजेत्या इंग्लंडचा पुन्हा एकदा मोठा पराभव झाला आहे. वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर तब्बल 229 धावांनी विक्रमी विजय मिळविला आहे. गजविजेत्या इंग्लंडचे बलाढ्य फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 400 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 170 धावांत गारद झाला आहे.
400 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर जॉनी बेयरस्टो दहा धावांत बाद झाला. त्यानंतर जो रुटही दोन धावांवर तंबूत परतला. तर बेन स्टोक्सही पाच धावांवर बाद झाला. हॅरी ब्रुकही स्वस्तात तंबूत परतला. जोस बटलरही सात चेंडूत 15 धावा करून बाद झाला. शंभर धावांमध्ये इंग्लंडचे आठ फलंदाज बाद झाले होते.
ODI World Cup 2023 : बाबर आझम चिडला! ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
शेवटी मार्क वूड आणि गस गटकिंसनने नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करत इंग्लंडची लाज राखली आहे. शेवटी केशव महाराजने एटकिंसनचा त्रिफळा उडवत इंग्लंडचा डाव 170 धावांत संपुष्टात आणला. लुंगी एनगिडी व मार्क जनसेनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर जेरलेड कोइटिझने तीन बळी घेतले आहेत.
India vs New Zealand : हार्दिक पांड्याच्या जागी कोणाला मिळणार संधी? ‘या’ नावांची चर्चा
नाणेफेक जिंकू फलंदाजीला उतरलेल्या आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर क्विंटन डिकॉक हा चार धावांवर तंबूत परता. त्यानंतर रीजा हेंड्रिक्स आणि रेसी वेन डर डुसेनने दुसऱ्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. आदिल राशिदने वेन डुसेला 60 धावांवर बाद केले. हेंड्रिक्स 85 धावांवर बाद झाला. अॅडम मार्करम 42 धावांवर बाद झाला. हेनरिक क्लासेनने मात्र तडाखेबाज फलंदाजी करत आफ्रिकेचा डाव सांभाळला आहे. त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत 61 चेंडूत शतक झळकविले.
क्लासेनने मार्को जेनसनबरोबर सहाव्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी केली. त्यामुळे आफ्रिकेने सात बाद 399 धावांवर मजल मारली. क्लासेनने 67 चेंडूचा सामना करत 107 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने बारा चौकार आणि सहा षटकार ठोकले. जेनसेनने 42 चेंडूत 75 धावांची नाबाद खेळी केली.