Download App

वानखेडेवर पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचे अनावरण

Sachin Tendulkar Statue at Wankhede Stadium: भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्या हस्ते सचिनच्या पुतळ्याचं (Sachin Tendulkar Statue) अनावरण झालं. यावेळी सचिन तेंडुलकर स्वत: उपस्थित होता. हा पुतळा तब्बल 22 फूट उंचीचा बांधण्यात आला आहे.

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होता. वानखेडे स्टेडियम येथे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्यावतीने महान फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा २२ फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय मुर्तीकार प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा तयार केला आहे.


क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या आयुष्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये सचिनच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सचिनच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आला आहे.

दिल्ली आणि मुंबईत वर्ल्डकप सामन्यांदरम्यान आतिशबाजी नाही, बीसीसीआयचा निर्णय

नवीन खेळाडूंना त्याच्याकडे बघून प्रेरणा मिळण्याच्या उद्देशानं हा पुतळा उभा करण्यात आला आहे. वानखेडेच्या ‘एमसीए’ लाउंजमध्ये हा सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमाला बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआय कोषाध्यक्ष आशिष शेलार, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे उपस्थित आहेत. सचिननं वानखे़डेवर मैदानावर अनोखे विक्रम केले आहेत.

Tags

follow us