India and Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 2 गडी राखून पराभव केला होता. अशा प्रकारे टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पुढे आहे. या मालिकेतील दुसरा सामना उद्या (26 नोव्हेंबर) तिरुअनंतपुरममध्ये (Thiruvananthapuram) खेळवला जाणार आहे. विशाखापट्टणमची T20 क्रिकेटसाठी चांगली होती. त्यामुळे दोन्ही संघांनी 200 धावांचा टप्पा पार केला होता. पण उद्या होणाऱ्या टी-20 सामन्यात तिरुअनंतपुरममधील खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असेल की गोलंदाजांचे आव्हान असेल? पाहूया पिच रिपोर्ट…
ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमची आकडेवारी काय सांगते?
तिरुअनंतपुरममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. म्हणजेच फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे नाही. या खेळपट्टीवर कमी धावसंख्येचे सामने झाले आहेत. ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांना गोलंदाजांसमोर धावा काढण्यासाठी झगडावे लागत आहे. या मैदानावर टी-20 फॉरमॅटमध्ये सरासरी केवळ 114 धावा आहेत. आतापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय सामने या मैदानावर खेळले गेले आहेत.
PM Modi यांनी तेजस विमानातून मारला आकाशात फेरफटका, पाहा फोटो
त्याच वेळी, तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये संघांना धावांचा पाठलाग करणे सोपे जाते. आतापर्यंत 2 सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर 1 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.
Malaika Arora : बॅकलेस ड्रेसमधला मलायका अरोराचा हॉट अंदाज
आघाडीच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार
याआधी भारतीय संघाने विशाखापट्टणम T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 विकेटने पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 3 गडी गमावून 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 19.5 षटकांत 209 धावा करत सामना जिंकला. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने 42 चेंडूत सर्वाधिक 80 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार मारले. या शानदार खेळीसाठी टीम इंडियाच्या कर्णधाराला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.