Download App

IND vs SA Test : टीम इंडियाला आणखी एक धक्का, अष्टपैलू खेळाडू संघातून बाहेर

IND vs SA Test : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (IND vs SA Test) टीम इंडियाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. सेंच्युरियनमधील लाजिरवाण्या पराभवानंतर आता संघासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) सरावादरम्यान गंभीर जखमी झाला असून तो दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे.

शार्दुल गंभीर जखमी झाला
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, शार्दुल ठाकूर फलंदाजीचा सराव करत असताना त्याला ही दुखापत झाली. चेंडू थेट त्याच्या खांद्यावर आदळला होता. दुखापत झाल्यानंतर शार्दुलने गोलंदाजीचा सरावही केला नाही. हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. मात्र शार्दुलची दुखापत किती गंभीर आहे आणि त्याचे स्कॅनिंग आवश्यक आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.

विनेश फोगटकडूनही पुरस्कार परत, पोलिसांनी रोखल्यानं अर्जुन, खेलरत्न पुरस्कार कर्तव्यपथावरच ठेवले

पहिल्या कसोटीत अष्टपैलू खेळाडू शार्दुलला फलंदाजी करताना डाव्या खांद्याला दुखापत झाली. रबाडाचा उसळणारा चेंडूही शार्दुलच्या खांद्यावर आदळला होता, त्यानंतर त्याला दुखापतीचा त्रास जाणवत होता. त्याचवेळी गेराल्ड कोएत्झीचा एक बाउन्सरही त्याच्या कपाळावर आदळला होता.

पहिल्या कसोटीत गोलंदाजी प्रभावी नव्हती
सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूरची कामगिरी काही खास नव्हती. शार्दुलने 19 षटकात 101 धावा दिल्या आणि त्याला एकच विकेट मिळाली. त्याचवेळी फलंदाजीच्या पहिल्या डावात त्याच्या बॅटमधून 24 धावा आल्या होत्या, तर दुसऱ्या डावात शार्दुल केवळ 2 धावा करून बाद झाला.

टीम इंडियाचे 2024 मध्ये व्यस्त वेळापत्रक; वर्ल्ड कप, आयपीएलसह ‘या’ संघांसोबत होणार सीरिज

पहिल्या कसोटीत भारतीय संघाला एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. केपटाऊनमध्ये होणार्‍या दुसऱ्या कसोटीत रोहित आणि कंपनीला सेंच्युरियनमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

follow us