Download App

भारत-पाक मॅच अन् शिंदेंच्या शिलेदाराला 35 लाखांचा गंडा : दीड महिन्यानंतर घेतली पोलिसांची मदत

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांची पत्नी पल्लवी सरमळकर यांना तब्बल 35 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी सौरभ निकम आणि व्यंकट मंडाला यांना अटक करण्यात आली आहे. वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान (India- Pak Match) सामन्याचे तिकीट देतो असे सांगून सरमळकर दाम्पत्याची फसवणूक करण्यात आली होती. (Shiv Sena leader Kunal Sarmalkar has been cheated of 35 lakhs for the World Cup match tickets)

याबाबत अधिक माहिती अशी की, वर्ल्डकप 2023 मधील भारत-पाकिस्तान सामन्याची पल्लवी सरमळकर यांना तिकीटे हवी होती. मात्र त्यांना ती मिळत नव्हती. त्यामुळे त्यांनी ही तिकीटे बाह्य व्यक्तीकडून मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अशात व्यंकट मंडाला याच्या माध्यमातून त्यांना ही तिकीटे मिळतील असे सांगण्यात आले. त्यासाठी तब्बल 35 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे सरमळकर दाम्पत्याने पैसेही देऊ केले.

letsupp Special : ‘एका’ वर्षात ‘दोन’ महाराष्ट्र केसरी : नेमकी खरी स्पर्धा कोणती?

पण सामन्याआधी त्यांना तिकिटे तर नाहीच मिळाली, मात्र त्यानंतर त्यांना पैसेही परत करण्यात आले नाहीत. अनेक दिवस पाठपुरावा केल्यानंतरही पैसे परत होत नव्हते. शेवटी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आपली सुत्र हलवली आणि या प्रकरणामध्ये सौरभ निकम आणि व्यंकट मंडाला यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.

पाकिस्तानचे काही खेळाडू माझे यश…; हसन रझाच्या टीकेला शमीचं जोरदार प्रत्युत्तर

वर्ल्डकपमधील भारताच्या मॅचची तिकीटे मिळवण्यासाठी लोक धडपडत होती. बुक माय शो वरुन तिकीट बुकींग ओपन झाल्याच्या अवघ्या काही मिनिटात तिकीटे संपली असे सांगितले जायचे. त्यावरुन या तिकीटांचा काळाबाजार होत असल्याचं समोर आलं होतं. कारण काहींकडून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील भारत, न्यूझीलंड या सामन्याचं तिकीट मूळ किंमतीच्या चार ते पाच पटींनी अधिक किंमतीला विकले जात असल्याचा प्रकार समोर आला होतं. याशिवाय पुण्यातील भारत-बांग्लादेश सामन्यांच्या तिकीटाचाही काळा बाजार झाला असल्याचे सांगितले गेले होते.

Tags

follow us