Shreyas Iyer : बीसीसीआयने आज (6 जून) आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी भारतीय टी20 संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने श्रेयस अय्यरची भारतीय टी20 संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता भारतीय संघात सरपंच राज सुरु झाला आहे. श्रेयस अय्यरने मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या बैठकीत व्हर्च्युअली पद्धतीने सहभाग घेतला आणि त्यानंतर पत्रकार परिषदेतही भाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी अधिकृत घोषणा केली आणि श्रेयस अय्यरच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीनेही संघात स्थान मिळवले आहे.
श्रेयस अय्यरने 2025 मध्ये पंजाब किंग्सला अंतिम सामन्यापर्यंत नेले होते. 2024 मध्ये, त्याने केकेआरला आयपीएल चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईला विजय मिळवून दिला. दुखापतींमुळे यापूर्वी त्याला भारतीय संघातून बाहेर पडावे लागले असले तरी, आता तो एकदिवसीय (ODI) संघाचा उपकर्णधार आहे आणि त्याची टी20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारताला 2006 मध्ये पहिला टी20 कर्णधार मिळाला. तेव्हापासून 14 खेळाडूंनी टीम इंडियाचे टी20 आंतरराष्ट्रीय (T20I) सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे, एम.एस. धोनी, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हेच असे कर्णधार आहेत ज्यांनी टी20 विश्वचषक जिंकला आहे. श्रेयस अय्यर हा भारतीय टी20 संघाचा 15 वा कर्णधार बनला आहे.
भारतीय टी20 संघाच्या कर्णधारांची संपूर्ण यादी
वीरेंद्र सेहवाग
एम.एस. धोनी
सुरेश रैना
अजिंक्य रहाणे
विराट कोहली
रोहित शर्मा
शिखर धवन
के.एल. राहुल
ऋषभ पंत
हार्दिक पांड्या
जसप्रीत बुमराह
रुतुराज गायकवाड
सूर्यकुमार यादव
शुभमन गिल
श्रेयस अय्यर
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय T20 संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप, प्रिन्स आणि वैभव सूर्यवंशी.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय टी20 संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी, जसप्रीत बुमराह.
