Download App

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलच्या गळ्यात ‘कर्णधार’ पदाची माळ

बीसीसीआयकडून इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी शुभमन गिल भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. 

Indian Team Announced for England Tour : विराट कोहली आणि रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील निवृतीनंतर अखेर शुभमन गिलला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार घोषित करण्यात आले आहे. आज बीसीसीआयकडून (BCCI) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  शुभमन गिल (Shubman Gill) भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे तर यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) उपकर्णधार असणार आहे.  गिल हा टीम इंडियाचा चौथा सर्वात तरुण कर्णधार बनला आहे. तर इंग्लंड दौऱ्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना संधी मिळालेली नाही.

 

मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याला संधी देण्यात आलेली नाही. अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी दिली आहे. तर दुसरीकडे इंग्लंड दौऱ्यासाठी रणजीमध्ये शानदार कामगिरी करणारा करुण नायरा देखील संधी देण्यात आली तर साई सुदर्शन देखील भारतीय संघात दिसणार आहे.

भारताचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे. पहिला सामना 20 ते 24 जून दरम्यान खेळला जाईल, तर दुसरा सामना 2 ते 6 जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये होईल. तिसऱ्या सामना 10 जुलै ते 14 जुलै दरम्यान लॉर्ड्स येथे होणार आहे. तर या मालिकेतील चौथा सामना 23 ते 27 जुलै दरम्यान मँचेस्टर येथे खेळला जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जाणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी  16 सदस्यीय भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार) यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, आकाशदीप, कुलदीप यादव.

“चिडिया” बालपणातील स्वप्न आणि संघर्ष याच प्रभावी चित्रण; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार

follow us