Download App

Maharashtra Kesari: सिकंदर शेख आणि महेंद्रसिंग गायकवाड पुन्हा कुस्तीच्या मैदानात?

  • Written By: Last Updated:

सांगली : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेखवर (Sikandar Shaikh) अन्याय झाल्याच्या भावना सोशल मिडियावर व्यक्त केल्या जात आहेत. स्वत: सिकंदर शेखने देखील आपल्यावर अन्याय झाल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

सेमी फायनलच्या लढतीमध्ये चुकीच्या पद्धतीने महेंद्र गायकवाडला (Mahendra Gaikwad) जादा गुण दिल्याचा आरोप होत आहेत. या वादावर पडदा टाकण्यासाठी पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्रसिंग गायकवाड यांच्यात सांगलीत लवकरच मातीतील कुस्ती होणार आहे.

विशेष म्हणजे या कुस्तीसाठी अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे वस्ताद यांनी पुढाकार घेतला आहे.

पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माती गटातील अंतिम लढत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली होती. या लढतीत महेंद्रने मारलेला टांग डाव पूर्णपणे बसला नतसाना त्याला चार गुण दिल्याचा आरोप सिकंदर शेख याच्यासह सोशल मीडियावरून होत आहेत.

Tags

follow us