Download App

सलग दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियच्या टीमवर सर्जिकल स्ट्राईक : तब्बल 6 खेळाडू परत बोलावले

दिल्ली : भारत-ऑस्ट्रेलिया T20 मालिकेत दोन मॅच जिंकत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. नुकताच वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाला सलग 2 पराभव पाहायला लागल्याने मोठी नामुष्की ओढावली होती. यानंतर आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने उर्वरित मॅचेससाठी टीममध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप विजेत्या टीमचे सात खेळाडू T20 मालिकेसाठी भारतातच थांबले होते. मात्र यातील सहा खेळाडूंना आता मायदेशी परत बोलविण्यात आले आहे. (Six players have been recalled by the Australian Cricket Board after two successive defeats against India)

स्टीव्ह स्मिथसह, स्टार स्पीनर अॅडम झाम्पा यापूर्वीच मायदेशी परतला आहे. तर ग्लेन मॅक्सवेल, मार्क्स स्टॉइनिस, जोश इंग्लिस आणि शॉन अॅबॉट गुवाहाटीतील तिसऱ्या टी-20 मॅचनंतर ऑस्ट्रेलियाला परतणार आहेत. तर वर्ल्डकप विजेत्या प्लेइंग 11 मधील ट्रॅव्हिस हेड हा एकमेव खेळाडू भारतात टी-20 आंतरराष्ट्रीय टीमसोबत राहणार आहे. हेडने वर्ल्डकपमध्ये सुरुवातीच्या काही मॅचेस खेळल्या नव्हत्या. परंतु सेमी फायनल आणि फायनलला त्याने चमकदार कामगिरी करत टीमच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

ICC Champions Trophy : आधी ‘आशिया कप’ आता ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’; पाकिस्तानचं यजमानपद पुन्हा संकटात

ऑस्ट्रेलियन टीममध्ये कोणते नवीन खेळाडू आले?

ऑस्ट्रेलियाने कीपर-बॅट्समन जोश फिलिप आणि बिग हिटर बेन मॅकडरमॉट यांचा टीममध्ये समावेश केला आहे. हे दोघेही तिसऱ्या टी-20 साठी उपलब्ध असणार आहेत. तर बेन द्वारशुईस आणि स्पीनर ख्रिस ग्रीन चौथ्या मॅचपूर्वी रायपूरमध्ये टीममध्ये येतील.

ऑस्ट्रेलियाची नवीन टीम :

मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शुईस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, अॅरॉन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.

याला म्हणतात ग्रोथ! 8 वर्षात हार्दिक पांड्यांचे पॅकेज 10 लाखांवरुन 15 कोटींवर

टीम इंडियाला मालिका विजयाची संधी :

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने आधीच 2-0 ने आघाडी घेतली आहे. आज (28 नोव्हेंबर) तिसरी मॅच जिंकून भारताला मालिका विजयाची संधी असणार आहे. यापूर्वी पहिल्या टी-20 मॅचमध्ये विशाखापट्टणममध्ये भारताने शेवटच्या बॉलवर विजय मिळविला होता. तर तिरुअनंतपुरममध्ये खेळलेल्या दुसऱ्या मॅचमध्ये हाय स्कोरिंग रनचेस करताना ऑस्ट्रेलियाची टीम ढेपाळली होती. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 235/4 रन्स केल्या. पण यात ऑस्ट्रेलियाला 44 धावांनी पराभव पत्करावा लागला.

 

Tags

follow us