Smriti Mandhana And Palash Muchhal Chat Controversy : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. 23 नोव्हेंबर रोजी स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे सांगली येथे लग्न होणार होते मात्र अचानक स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधान आले आहे. पलाश मुच्छल याचा मेरी डि कोस्टा नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. तसेच त्यांच्यात झालेल्या फ्लर्टी चॅटचे स्क्रीनशॉट देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मेरी डि कोस्टा (Mary D’Costa) एक कोरिओग्राफर असून पलाशचे (Palash Muchhal) तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. मेरी डि कोस्टाने प्रतिक्रिया देत एक मोठा खुलासा केला आहे.
विरल भयानी ने दिलेल्या वृत्तानुसार, मेरी डि’कोस्टाने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ती कोरिओग्राफर नाही किंवा पलाशली तिचे कोणतेही संबंध नाहीत. तिने स्वतः चॅटचे स्क्रीनशॉट लीक केले होते, परंतु आता तिला टार्गेट करण्यात येत आहे.
मेरी डि’कोस्टाच्या व्हायरल पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, मीच ती व्यक्ती आहे ज्याने चॅट्स पोस्ट केले. मला कधीही माझी ओळख उघड करायची नव्हती. या चॅट्स मे ते जुलै 2025 दरम्यानच्या होत्या आणि फक्त एक महिना चालल्या. मी त्याला कधीच भेटली नाही, किंवा मी त्याच्याशी कोणत्याही नात्यात नाही. मी फक्त त्या हायलाइट केल्या कारण मला क्रिकेट आवडते, मी स्मृती मानधनाची मोठी फॅन आहे आणि मला वाटले की लोकांना हे माहित असले पाहिजे. मी ती कोरिओग्राफर नाही किंवा ज्याच्याशी त्याने फसवणूक केली ती व्यक्ती नाही. मला अशा प्रकारच्या प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती आणि मला माझे अकाउंट खाजगी करावे लागले.
तु निघून जा किंवा जीव दे… पतीच्या प्रेम संबंधातून पत्नीची आत्महत्या, संभाजीनगरमधील घटना
चॅट्सवरून स्पष्टपणे दिसून येते की ही माझी चूक नव्हती. मीच त्याला दुर्लक्षित केले. कृपया मला टार्गेट करू नका. मी खरोखर हे सहन करू शकत नाही. मला हे कधीच नको होते. मला वाटले की लोक समजतील कारण चॅट्समध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की ही माझी चूक नव्हती आणि मीच त्याला घोस्ट बनवले होते आणि मी कधीही कोणत्याही महिलेचे काहीही वाईट करणार नाही, मग ती प्रसिद्ध असो वा नसो असं या व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे.
