Download App

अवघे काहीचं तासं उरले आहेत; ‘आशाएं’ गाण बॅकग्राउंडला लावत गांगुलीचं ट्विट….

  • Written By: Last Updated:

Sourav Ganguly Tweet :  टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीने शुक्रवारी संध्याकाळी एक ट्विट केले, ज्यावरून अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. काही लोकांनी याला क्रिकेट करिअरशी संबंधित एका मोठ्या घोषणेशी जोडले तर काहींनी बायोपिकचाही उल्लेख केला. गांगुलीने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. (Sourav Ganguly Tweet On support & love keeps us going. Few more hours to go …)

याच त्याने सर्व फोटोंचा व्हिडिओ करत त्याच्या बॅकग्राऊंडला आशाएं हे गाणं लावलं आहे. याशिवाय या व्हिडिओला त्याने दिलेल्या कॅप्शनमुळे देखील चाहते कोड्यात पडले आहे. कॅप्शनमध्ये गांगुलीने तुम्ही दिलेला पाठिंबा आणि प्रेम आम्हाला आणखी मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करतं असे म्हणत आता काहीच तास उरले असल्याचे म्हटले आहे.

गांगुलीने शेअर केला व्हिडिओ

कोलकात्यात राहणाऱ्या 50 वर्षीय गांगुलीने शुक्रवारी एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील फोटो जोडण्यात आली आहेत. मात्र ट्विटर युजर्सनी यावर अंदाज बांधायला सुरुवात केली. काहींनी गांगुली क्रिकेटबाबत घोषणा करणार असल्याचे सांगितले, तर काहींनी गांगुलीच्या बायोपिकबाबत घोषणा करणार असल्याचे सांगितले.

गांगुलीचे करिअर

गांगुलीची कारकीर्द अतिशय नेत्रदीपक राहिली आहे. त्याने 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान, त्याने 16 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये कसोटीत एका द्विशतकाचा समावेश आहे, ज्यामुळे त्याने या फॉरमॅटमध्ये 7212 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 22 शतके आणि 72 अर्धशतकांसह 11363 धावा केल्या.

Tags

follow us