IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला; 25 वर्षांनंतर भारतात जिंकली कसोटी मालिका

IND vs SA : दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा तब्बल 408 धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका

IND Vs SA

IND Vs SA

IND vs SA : दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा तब्बल 408 धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असणाऱ्या दोन कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. या सामन्यात सुरुवातीपासून आफ्रिकेचे वर्चस्व पाहायला मिळाले.

549 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 63.5 षटकांतच सर्वबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने 408  धावांनी सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटी जिंकली गुवाहाटी कसोटीत (Guwahati Test) दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात आफ्रिकेने 489 धावा केल्या मात्र प्रत्युत्तरात भारतीय संघाला फक्त 201 धावा करता आल्या. पहिल्या डावात भक्कम आघाडी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डाव 260 धावांवर घोषित करत भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी 549 धावांचे लक्ष्य दिले होते पण दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त 140 धावांवर गारद झाला.

तर दुसरीकडे कोलकाता येथील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 30 धावांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात 408 धावांनी भारताचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेने (South Africa) तब्बल 25 वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकली आहे.

भारताचा लाजिरवाणा पराभव

कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. याआधी 2004 मध्ये नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 342 धावांनी पराभव केला होता. तर यापूर्वी भारतात न्यूझीलंडने भारताचा 3-0 ने पराभव करत क्रिकेट चाहत्यांना धक्का दिला होता.

GOAT हाय-एनर्जी अ‍ॅनिमेटेड स्पोर्ट्स कॉमेडीचा नवीन ट्रेलर रिलीज; ‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

Exit mobile version