Antim Panghal : भारताची महिला कु्स्तीपटू अंतिम पंघाल (Antim Panghal) हीने जबरदस्त कामगिरी करत इतिहास रचला. वीस वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेतील 53 किलो वजन गटात विश्वविजेता होण्याचा पंघालने मिळवला. सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचाही मान तिने मिळवला. जागितक कुस्ती स्पर्धेच्या (World Wrestling Championship) अंतिम सामन्यात अंतिम पंघालने युक्रेनच्या मारिया येफ्रेमोवा हीचा 4-0 असा पराभव करत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. प्रतिस्पर्धी खेळाडूला फक्त दोन गुणच मिळवता आले.
IND vs IRE : पहिल्याच सामन्यात पावसाचा खेळ! टीम इंडियाने अवघ्या 2 धावांनी सामना जिंकला
यंदाची स्पर्धा भारतीय कुस्तीपटूंसाठी अत्यंत फायद्याची ठरली. सात खेळाडूंनी तीन सुवर्णपदके पटकावली. तसेच एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांचीही कमाई केली. या दिवसाचा अविस्मरणीय क्षण म्हणजे अंतिम पंघालने युक्रेनच्या खेळाडूवर केलेली मात. या सामन्यात भारताची एकमेव रौप्यपदक विजेती अंतिम कुंडू मात्र सुवर्णपदक मिळवण्यात अयशस्वी ठरली. एनिको एलेक्सकडून तिला पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे रीना या कुस्तीपटूने कझाकस्तानच्या शुगिला ओमिरबेक हीचा 9-4 असा पराभव करत ब्राँझपदक मिळवले. तर हर्षिताने मोल्दोव्हच्या एमिलिया क्रेसियनला पराभूत करून कांस्यपदकाची कमाई केली.
या सामन्यात भारतीय कुस्तीपटूंनी एकूण सात पदके जिंकली. यामध्ये तीन सुवर्णपदके समाविष्ट आहेत. 62 किलो वजनी गटात गोल्ड मेडलिस्ट सविताने आपल्या कामगिरीने सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले. सविताने टेक डाउन टू पॉइंटसह सुरुवात केली. त्यानंतर सातत्याने आघाडीवर राहिली. सविताने दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला एकही अंक गमावला नाही आणि इतिहास रचला.
Vinesh Phogat ; एशियन गेम्सपूर्वी भारताला मोठा धक्का, विनेश फोगट स्पर्धेतून बाहेर