IND vs IRE : पहिल्याच सामन्यात पावसाचा खेळ! टीम इंडियाने अवघ्या 2 धावांनी सामना जिंकला

IND vs IRE : वेस्टइंडिज विरुद्धची टी 20 सामन्यांची मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने (IND vs IRE) पुन्हा एकदा विजयी वाटचाल सुरू केली आहे. भारतीय संघाने पहिल्या टी 20 सामन्यात आयर्लंड (Ireland) संघाचा अवघ्या दोन धावांनी पराभव केला. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. बराच वेळ पाऊस सुरू होता. अखेर पंचांनी डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे निकाल […]

T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? BCCI ने दिली महत्वाची अपडेट

T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? BCCI ने दिली महत्वाची अपडेट

IND vs IRE : वेस्टइंडिज विरुद्धची टी 20 सामन्यांची मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने (IND vs IRE) पुन्हा एकदा विजयी वाटचाल सुरू केली आहे. भारतीय संघाने पहिल्या टी 20 सामन्यात आयर्लंड (Ireland) संघाचा अवघ्या दोन धावांनी पराभव केला. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. बराच वेळ पाऊस सुरू होता. अखेर पंचांनी डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे निकाल दिला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आयर्लंडने 140 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचाा पाठलाग करताना भारताने 6.5 ओव्हरमध्ये 47 धावा केल्या होत्या. दोन विकेट्सही गमावल्या होत्या. यानंतर मात्र पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवावा लागला.

पाऊस बराच वेळ सुरू होता. मैदानातही पाणी जमा झाले होते. त्यामुळे सामना पुन्हा सुरू होईल याची शाश्वती नव्हती. डकवर्थ लुईस नियमानुसार सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला 6.5 ओव्हरमध्ये 45 रन्स करणे गरजेचे होते. संघाने मात्र 47 रन्स केले होते. त्यामुळे 2 धावांनी हा सामना भारताने जिंकल्याचे पंचांनी जाहीर केले.

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. पहिल्या 6 ओव्हर्समध्ये दमदार फलंदाजी करत एकही विकेट न गमावता 45 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल 24 आणि ऋतुराज गायकवाडने 18 धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र क्रेग यंगने संघाला दोन जोरदार धक्के दिले. यशस्वी जैस्वाल त्यानंतर आलेला तिलक वर्मा या दोघांना बाद केले.

Archers World Cup : भारतीय तिरंदाजांचा अचूक लक्ष्यभेद; ‘रिकर्व्ह’ प्रकारात ब्राँझपदकांची कमाई

त्यानंतर संजू सॅमसन मैदानात आला. तोपर्यंत भारताच्या 47 धावा झाल्या होत्या. पुढील सामना मात्र होऊ शकला नाही. कारण, पाऊस सुरू झाला. जोरदार पाऊस असल्याने सामना काही सुरू होऊ शकला नाही. पावसाचा जोर ओसरत नसल्याचे पाहून अखेर पंचांनी डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारतीय संघाला विजयी घोषित केले.

Exit mobile version