Download App

Sri Lanka : श्रीलंका क्रिकेटमध्ये वादळ; 24 तासांच्या आत दोन प्रशिक्षकांचे राजीनामे

श्रीलंका क्रिकेटमध्ये वादळ आलं आहे. दिग्गज महेला जयवर्धने नंतर संघाचे मुख्य प्रशिक्षकांनी देखील राजीनामा दिला आहे.

Sri Lanka Cricket : यंदाच्या टी 20 विश्वचषकात श्रीलंका संघाची कामगिरी (Sri Lanka Cricket) अतिशय खराब राहिली. सुपर 8 सोडाच साखळी फेरीतच संघाचे आव्हान संपुष्टात आले. साखळी सामन्यात (T20 World Cup 2024) बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला तर नेपाळ विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. या अपयाशानंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये वादळ आलं आहे. दिग्गज महेला जयवर्धने नंतर संघाचे मुख्य प्रशिक्षकांनी देखील राजीनामा दिला आहे.

माजी खेळाडू जयवर्धनेला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. जयवर्धनेने राजीनामा दिल्यानंतर चोवीस तासांच्या आता हेड कोच सिल्वरवूड यांनीही राजीनामा दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या संघाचं प्रशिक्षक असणे म्हणजे मोठा काळ आपल्या कुटुंबापासून दूर राहणे. आता परिवारातील सदस्यांशी चर्चा केल्यानंतर कुटुंबासाठी वेळ देण्याचा निर्णय घेतल्याचे क्रिस सिल्वरवूड यांनी सांगितले.

इंग्लंडचे माजी (IND vs ENG) खेळाडू 49 वर्षीय क्रिस सिल्वरवूड यांनी 2022 मध्ये श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याआधी त्यांनी इंग्लंड संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली होती. सिल्व्हरवूड यांनी त्यांच्या कार्यकाळात श्रीलंकेला टी 20 आशिया कप विजेतेपद मिळवून दिले. परंतु, आताच्या टी 20 विश्वचषकात श्रीलंकेची कामगिरी अतिशय खराब राहिली. स्पर्धेतील साखळी सामन्यातच आव्हान संपुष्टात आले.

T20 World Cup : वॉर्नरचा गुडबाय; ‘या’ दिग्गज खेळाडूंनाही क्रिकेट निवृत्तीचे वेध

यानंतर पुढील वर्षात झालेल्या 50 ओव्हर्सच्य आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेने फायनल सामन्यात धडक दिली होती. यानंतर मागील वर्षी भारतात आयोजित करण्यात आलेल्या वन डे विश्वचषक स्पर्धेत संघाचे प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिले होते. श्रीलंकेचा संघ थेट नवव्या क्रमांकावर राहिला होता. या स्पर्धेतील 9 पैकी सात सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.

आता अमेरिका आणि वेस्ट इंडीज मध्ये सुरू असलेल्या टी 20 विश्वचषकातही श्रीलंकेला सुपर 8 फेरीतही पोहोचता आले नाही. आयसीसी स्पर्धेतील ही श्रीलंकेची सर्वात खराब कामगिरी राहिली. सिल्व्हरवूड यांच्या प्रशिक्षक पदाच्या काळात श्रीलंकेने 8 कसोटी, 26 एकदिवसीय आणि 18 टी 20 सामने जिंकले. याआधी बुधवारी महेला जयवर्धनेने संघाचे फलंदाजी मार्गदर्शकाचे सोडले. सन 2022 मध्ये जयवर्धनेला एका वर्षासाठी या पदावर नियुक्त करण्यात आले होते. नंतर मात्र क्रिकेट बोर्डाने जयवर्धनेला एक वर्ष मुदतवाढ दिली होती.

अक्षर-कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण; दणदणीत विजयासह टीम इंडिया फायनलमध्ये

follow us

वेब स्टोरीज