दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी; श्रीलंकेवर मिळवला एकतर्फी विजय
South Africa beat Sri Lanka : टी 20 विश्वचषकात काल दक्षिण आफ्रिकेने विजयी (T20 World Cup 2024) सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत आघाडी घेतली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला फक्त 77 धावा करता आल्या. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाने एकतर्फी विजय मिळवला. क्विंटन डीकॉक 20 आणि हेनरिक क्लासेनने 19 धावा केल्या.
T20 WC 2024: वर्ल्डकप सामन्यातील पहिलीच सुपर ओव्हर; नामिबियाचा ओमानवर थरारक विजय
First-rate fast bowling 🚀
Anrich Nortje takes home the @Aramco POTM after he returned excellent figures of 4/7 🔥#T20WorldCup #SLvSA pic.twitter.com/9fj5R6xonR
— ICC (@ICC) June 3, 2024
सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला फक्त 78 धावांची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे दोन फलंदाज 27 धावांच्या आत बाद झाले होते. यानंतर क्विंटन डीकॉक आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी चांगली फलंदाजी केल्याने आफ्रिकी संघाने विजय मिळवला. दहा ओव्हरमध्येच दक्षिण आफ्रिकेच्या 47 धावा झाल्या होत्या. जिंकण्यासाठी 60 चेंडूत 31 धावांची गरज असताना डीकॉक आऊट झाला. यानंतर ट्रिस्टन स्टब्सही तंबूत परतला. वानिंदू हसरंगाने या दोघांना बाद केले. काही वेळ श्रीलंकेने सामन्यात वापसी केली होती. यानंतर डेव्हिड मिलरने सतराव्या ओव्हरमध्ये संघाला विजय मिळवून दिला.