Manu Bhaker in Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिक्स स्पर्धेत (Paris Olympics2024) मनू भाकरने पुन्हा एकदा चमकदारी कामगिरी केली आहे. दहा मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर (Manu Bhaker) आणि सरबज्योत सिंह यांनी कांस्यपदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंनी लक्ष्याचा वेध घेत कास्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेतील मनू भाकरचे हे दुसरे पदक ठरले. एकाच स्पर्धेत दोन पदके मिळवणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे.
Paris Olympics 2024 | Shooters Manu Bhaker and Sarabjot Singh win Bronze medal in 10m Air Pistol Mixed team event pic.twitter.com/FIbf0dTKDP
— ANI (@ANI) July 30, 2024
पॅरिस ऑलिम्पिक्स स्पर्धांचा आज चौथा दिवस आहे. आज मनू भाकर आणि सरबज्योत सिंह पदक जिंकण्यात यशस्वी ठरले. मनू ऑलिम्पिकच्या इतिहासात दोन मेडल जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूने अशी कामगिरी केलेली नाही. सुशील कुमा आणि पीव्ही सिंधू यांनी अशी कामगिरी केली आहे पण हे मेडल एकाच ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले नाहीत.
मनू भाकर बरोबर या सामन्यात सरबज्योत सिंहही होता. सरबज्योत हरियाणातील धीन गावाचा रहिवासी आहे. चंडीगड येथून त्याने शिक्षण पूर्ण केलं आहे. सर्वसामान्य कुटु्ंबातील सरबज्योतला नेमबाजीचा छंद होता. त्याच्या आई वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिलं. शाळेत असतानाच त्याने नेमबाजीचा सराव करण्यास सुरुवात केली होती. विविध स्पर्धात यश मिळवलं होतं. त्यानंतर आज थेट ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याची संधी त्याला मिळाली.
मनू भाकर पुन्हा करणार करिश्मा, भारताला मिळणार आणखी एक पदक, जाणून घ्या कसं?
मनू भाकर आणि सरबज्योत सिंह जोडीला पहिल्या सिरीजमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. 2-0 अशा पिछाडीवर पडल्यावर पुढील चार सिरीज मात्र जिंकल्या. यामुळे 8-2 असा स्कोअर झाला. यानंतर पुन्हा एक सिरीज भारताने आणि एक सिरीज कोरियाने जिंकली. त्यानंतर 10-4 असा स्कोअर झाला होता. यानंतर कोरियाने पुन्हा एक सिरीज जिंकली आणि स्कोअर 10-6 असा झाला. पुढील दोन स सिरीज मात्र भारताने जिंकल्या. अकरावी आणि बारावी सिरीज कोरियाने जिंकली त्यामुळे स्कोअर लाइन 14-10 अशी झाली. तेरावी सिरीज मात्र मनू भाकर आणि सरबज्योतने जिंकली. यानंतर भारत 16-10 अशा फरकाने कांस्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरला.