Team India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लवकरच (IND vs ENG Test Series) सुरु होणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा (Team India) इरादा आहे. मात्र त्याआधीच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. झारखंडचा डावखुरा फलंदाज सौरभ तिवारीने (Saurabh Tiwary) व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. सौरभ तिवारी सध्या रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. निवृत्तीचा घोषणा केल्यानंतर आता तो त्याचा अखेरचा सामना 15 फेब्रुवारी रोजी खेळणार आहे.
सौरभ तिवारीने वयाच्या अकराव्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो भरपूर खेळला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने फक्त 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यानंतर मात्र त्याला टीम इंडियात संधीच मिळाली नाही.
IND vs ENG : टीम इंडियाला धक्का! विराट, राहुल पाठोपाठ ‘हा’ स्टार फलंदाज मालिकेतून बाहेर?
निवृत्ती जाहीर केल्यानंतर सौरभची पहिली प्रतिक्रियाही समोर आली आहे. क्रिकेटमधील प्रवास इतक्यात थांबवणं माझ्यासाठी खरंच कठीण होतं. परंतु मला माहिती होतं की निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही जर राष्ट्रीय आणि टी 20 लीग टीममध्ये नाहीत तर युवा खेळाडूंसाठी राज्याच्या संघात जागा रिक्त करून देणेच योग्य आहे. कसोटी संघात माझी निवड होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे हा निर्णय मी घेतला आहे.
सौरभच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर त्याने आतापर्यंत 115 सामन्यात 8 हजार 30 धावा केल्या आहेत. 22 शतके त्याच्या नावावर आहेत. 116 अ श्रेणीच्या सामन्यात त्याने 46.55 च्याा सरासरीने 4 हजार 50 धावा केल्या आहेत. टीम इंडियासाठी मात्र फक्त 3 सामन्यातच त्याला संधी मिळू शकली. या तीन सामन्यात त्याने 49 धावा केल्या होत्या. या सामन्यानंतर मात्र संघ व्यवस्थापनाने त्याचा कधीच विचार केला नाही.
IND vs ENG : टीम इंडियाला मोठा झटका! के.एल राहुलच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी!
गुरुवारपासून तिसरा कसोटी सामना
भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये मालिकेतला तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने सांगितले की, उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी फिटनेसमुळे केएल राहुलला राजकोट येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. राहुलने 90 टक्के फिटनेस गाठला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तो प्रगती करत आहे.