IND vs NZ : भारताने वर्ल्ड-कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर (Ind vs NZ) 70 रन्सने शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळी आणि शमीच्या सात विकेट्सच्या मोबदल्यात भारताने हा विजय नोंदविला. या विजयासह भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर फायनलमध्ये जाण्याचं न्यूझीलंडचं स्वप्न भंगलं आहे. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याची प्रतिक्रिया समोर आली आहे. यानंतर आता न्यूझीलंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
सर्वात आधी टीम इंडियाचं अभिनंदन. एकदम शानदार खेळ करत ते टॉपच्या संघासारखं खेळले. शेवटपर्यंत आमच्या संघातील खेळाडू लढले याचा मला अभिमान वाटतो. भारताच्या वर्ल्ड क्लास फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी केली. बॉल स्विंग होत असल्याने कठीण होतं तरीपण ते 400 पर्यंत पोहोचले. हरलो असलो तरी भारतात खेळल्याचा आम्हालाही आनंद आहे. रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल हे दोन खेळाडू आमच्यासाठी स्पेशल आहेत.
सुरुवातीला भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने संघाला तुफानी सुरुवात करून दिली. रोहितने पहिल्या ओव्हरपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरू केली. दोघांनीही 8 ओव्हर्समध्ये 70 धावा फटकावल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात नवव्या ओव्हरमध्ये रोहित 47 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि शुभमनने धावफलक हालता ठेवला.
79 धावांववर असताना शुभमन रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर श्रेयस अय्यरला हाताशी धरत विराट आणि श्रेयसने 210 धावांची भागीदारी रचली. विराट कोहली 117 धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयसने सुत्र हातात घेतली आणि त्यानेही शानदार शतक झळकावले. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांनीही शानदार खेळी केली. 50 ओव्हर्सनंतर भारताने न्यूझीलंडसमोर 398 धावांचे डोंगराएवढे आव्हान उभे केले होते. न्यूझीलंडची सुरुवात काहीशी खराब झाली. शामीनेच या दोघांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला.
Ind vs Ban: विराट कोहलीने सचिन तेंडुलकराचा आणखी एक विक्रम मोडला !
कोहलीने सचिनला टाकले मागे
भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील पहिल्या सेमीफायनलमध्ये रनमशीन विराट कोहलीने 50 वे ऐतिहासिक एकदिवसीय शतक झळकावले. या शतकानंतर आता दि ग्रेट सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मागे टाकत विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा क्रिकेटर ठरला आहे. याशिवाय एका एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचाच 673 धावांचा विक्रमही विराटने त्याच्या नावावर केला आहे.