T. Dilip Story : टीम इंडियाच्या भन्नाट फिल्डिंगचं रहस्य कळलं; गणिताच्या गुरुजींनी दिला विनिंग फॉर्म्यूला

T. Dilip Story : टीम इंडियाच्या भन्नाट फिल्डिंगचं रहस्य कळलं; गणिताच्या गुरुजींनी दिला विनिंग फॉर्म्यूला

T. Dilip Story : विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया (World Cup 2023) जबरदस्त कामगिरी करत आहे. भारत हा एकमेव असा संघ आहे ज्याने अजून एकही सामना गमावलेला नाही. मैदानात टीम इंडियाचे (Team India) खेळाडू फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीच नाही तर फिल्डिंगमध्येही चमकदार कामगिरी करत आहेत. कधीकाळी फिल्डिंगमध्ये ‘ढ’ असणारा भारताचा संघ आता या क्षेत्रातही तुफान कामगिरी करत आहे. ‘कॅचेस विन मॅचेस’ असं म्हटलं जातं. डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करेपर्यंत कॅच टिपले जातात अशी अचंबित करणारी फिल्डिंग खेळाडू करत आहेत. मागील दोन-तीन महिन्यात असं काय घडलं की टीम इंडियाचा दबदबा क्षेत्ररक्षणातही दिसून येत आहे.

World Cup 2023 : 6 मिनिटांच्या उशीरानंतरही गांगुली वाचला; 16 वर्षांपूर्वी काय घडलं?

याचं खरं कारण म्हणजे भारतीय संघाच्या या कामगिरीमागे एका शाळेतल्या शिक्षकाचा हात आहे. संघाचे फिल्डिंग कोच टी. दिलीप (T. Dilip) एकेकाळी शाळेत गणिताचे शिक्षक होते. राज्य क्रिकेट अकादमीच्या ज्युनियर वयोगटातील कार्यक्रमाचे प्रशिक्षक म्हणून काम करायच आणि आयपीएलमधील डेक्कन चार्जर्स या संघासाठी सहायक क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी. दिलीप यांनी काम केले आहे.

टी. दिलीप यांचा आतापर्यंतचा प्रवास प्रेरणादायक असाच आहे. कुटुंबाकडून त्यांच्या क्रिकेटच्या महत्वाकांक्षेला फारसा पाठिंबा मिळाला नाही. त्यांना गणिताची शिकवणी देण्यास भाग पाडण्यात आले. दिलीप हे खूप मेहनती प्रशिक्षक आहेत. त्यांनी बेसबॉल प्रशिक्षक माइक यंग यांचे सहाय्यक म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच टी. दिलीप यांनी आर. श्रीधर यांच्याबरोबर ईएनसीए मध्येही काम केले आहे. विश्वचषकात भारतीय संघाचे खेळाडू जे उत्कृ्ष्ट क्षेत्ररक्षण करत आहेत त्याचे श्रेय दिलीप यांनाच जाते. रोहित शर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट फिल्डिंगसाठी पदक मिळाले. याआधी विराट कोहली, रवींद्र जडेजा, शुभमन गिल यांनाही पुरस्कार मिळाला आहे.

World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच बांग्लादेशकडून लंकेची शिकार ! तीन विकेट्सने केला पराभव

विश्वचषकात टीम इंडिया अव्वल 

दरम्यान, या विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. भारतीय संघाने आतापर्यंत एकही पराभव पाहिलेला नाही.  या विश्वचषकात टीम इंडिया अव्वल आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये संघाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. क्षेत्ररक्षणात कमालीची सुधारणा झाली आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षणाने भारताने प्रतिस्पर्धी संघांना चांगलेच हैराण केले आहे. यामुळे टीम इंडियाला फायदा मिळाला असून विजय मिळवण्यात दर्जेदार क्षेत्ररक्षणाचाही मोठा वाटा राहिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube