Download App

काय सांगता! सामन्याआधी टॉस होणार नाही? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..

देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्वरुपात काही बदल करण्याच्या तयारीत बीसीसीआय आहे. सीके नायडू ट्रॉफीसंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

Toss Eliminated from CK Naidu Trophy : क्रिकेट सामन्यात नाणेफेकीचं वेगळंच महत्व आहे. सामना सुरू (Toss Eliminated) होण्याआधी टॉस होता. यानंतर खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज घेऊन प्रतिस्पर्धी संघांचे कर्णधार निर्णय घेत असतात. क्रिकेट चाहतेही आधी टॉसची चर्चा करतात. सामन्याआधी कुणी टॉस जिंकला रे.. असे शब्द कधीतरी तुमच्याही कानी पडले असतील. तर आता टॉसच इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. पण, थांबा हा निर्णय आंतरराष्ट्रीय सामन्यात नाही तर देशांतर्गत क्रिकेटच्या सामन्यात घेतला जाऊ शकतो. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआयने दिलेली नाही.

देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्वरुपात काही बदल करण्याच्या तयारीत बीसीसीआय आहे. सीके नायडू ट्रॉफीसंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावात टॉस रद्द करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती आहे. या स्पर्धेत पाहुण्या संघाला फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची याचा निर्णय घेण्याची मुभा राहिल. हा प्रस्ताव बीसीसीआयचे सचिव जय शाह, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, मुख्य कोच राहुल द्रविड आणि राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यातील चर्चेनंतर तयार करण्यात आला आहे.

Team India Australia Tour : टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाच्या कसोटीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा

फक्त टॉसच नाही तर या स्पर्धेत अंक प्रणालीही लागू करण्यात येईल. स्पर्धेत समतोल साधण्याच्या उद्देशाने नवीन अंक प्रणाली लागू करण्यात येईल. यात पहिल्या डावात चांगली फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी अंक देण्यात येतील. या व्यतिरिक्त आघाडी किंवा विजयासाठीही गुण देण्यात येतील. रणजी ट्रॉफी दोन टप्प्यात विभागण्यावरही विचार केला जात आहे. देशांतर्गत क्रिकेट व्यवस्थापनाचा एक मसूदा प्रस्ताव मंडळाच्या वरिष्ठ समितीकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

follow us