श्रीलंकेमुळे पाकिस्तानचं वर्ल्ड कप स्पर्धेतून पॅकअप, न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये

पाकिस्तानला नेट रन रेटच्या हिशोबाने सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी श्रीलंकेला 147 धावांपर्यंत रोखणं बंधनकारक होतं.

News Photo   2026 02 28T225327.233

श्रीलंकेमुळे पाकिस्तानचं वर्ल्ड कप स्पर्धेतून पॅकअप, न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये

यजमान श्रीलंकेने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील आपल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 213 धावांचा पाठलाग करताना 16 व्या ओव्हरमध्ये 148 धावा पूर्ण केल्या. श्रीलंकेने 148 वी धाव घेताच पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. तर श्रीलंकेमुळे न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली.  या सामन्यात पाकिस्तानचा 5 धावांनी विजय झाला असला तरी उपांत्य फेरी मात्र हातून गेली आहे.

न्यूझीलंड यासह उपांत्य फेरीत पोहचणारी तिसरी टीम ठरली. पाकिस्तानला नेट रन रेटच्या हिशोबाने सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी श्रीलंकेला 147 धावांपर्यंत रोखणं बंधनकारक होतं. मात्र पाकिस्तानचे गोलंदाज श्रीलंकेला 147 धावांआधी रोखण्यात अपयशी ठरले. त्यामुळे सामन्याच्या निकालाआधीच पाकिस्तानचा बाजार उठला. तर श्रीलंकेमुळे न्यूझीलंडने सुटकेचा निश्वास सोडला.

Exit mobile version