Download App

ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला मोठा झटका, ‘त्या’ प्रकरणात आत्मसमर्पण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Sushil Kumar : ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला (Sushil Kumar) आज सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court) मोठा धक्का दिला आहे.

  • Written By: Last Updated:

Sushil Kumar : ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला (Sushil Kumar) आज सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court) मोठा धक्का दिला आहे. कुस्तीगीर सागर धनखरच्या (Sagar Dhankhar) हत्येप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुशील कुमारला एका आठवड्यात आत्मसपर्पण करण्याचे आदेश दिले आहे. कुस्तीगीर सागर धनखरच्या हत्या प्रकरणात सुशील कुमार बराच काळापासून तुरुंगात होता. मात्र या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) त्याला जामीन मंजूर केला होता मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन रद्द करत त्याला एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहे.

आत्मसमर्पण करावे लागेल

दिल्ली उच्च न्यायालयाने कुस्तीगीर सागर धनखरच्या हत्या प्रकरणात सुशील कुमारला जामीन मंजूर केला होता मात्र जामीन रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात सागरच्या वडिलांनी केली होती. या प्रकरणात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत सुशील कुमार याचा जामीन रद्द केला आहे. मे 2021 मध्ये दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये ज्युनियर कुस्तीगीर सागर धनखरला मारहाण करण्यात आली होती.

मृत कुस्तीगीर सागर धनखरच्या वडिलांचा दावा आहे की साक्षीदारांवर आरोपी सुशील कुमारने जामिनावर बाहेर आल्यानंतर दबाव आणला होता. यावेळीही असेच होण्याची शक्यता आहे. अशोक धनकर यांचा आरोप आहे की आता पुन्हा त्यांच्या कुटुंबावर तडजोड करण्यासाठी दबाव आणला जात आहे. या प्रकरणाचे व्हिडिओ पुरावे देखील आहेत, ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आहे.

ध्वाजारोहणास छगन भुजबळांचा नकार अन् मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; महायुतीत नाराजीनाट्य? 

नेमकं प्रकरण काय?

5 मे 2021 च्या रात्री दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती विजेता सागर धनकरला सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लाठ्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे सागरचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या प्रकरणात एकूण 13 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हेगारी कट, अपहरण, दरोडा, दंगल, हत्येचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

follow us