Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताचा टी20 संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने शानदार कामगिरी करत मुंबईला विजय मिळून दिला आहे. आयपीएल 2026 नंतर पहिल्यांदाच मैदानावर उतरलेल्या सूर्य कुमार यादवने हैदराबादच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. कोलकाता येथे झालेल्या या सामन्यात मुंबईकडून खेळताना सूर्यकुमार यादवने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि नाबाद राहत 21 चेंडूंत 60 धावांची आक्रमक खेळी केली.
या सामन्यात (Syed Mushtaq Ali Trophy) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार ‘सूर्या’ने 285.71 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 6 चौकार आणि 5 षटकार लगावले. अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक गाठून 173 धावांचे लक्ष्य अगदी सोपे करून दाखवले. त्याच्या या आक्रमक खेळीच्या जोरावर, मुंबईने 13.1 षटकांत 3 विकेट्स गमावून विजयाचे लक्ष्य गाठले आणि स्पर्धेची सुरुवात 7 विकेट्स राखून दणदणीत विजयाने केली.
मुशीर खानचे अर्धशतक आणि शिवम दुबेची फिनिशिंग टच
सूर्यकुमार यादवव्यतिरिक्त (Suryakumar Yadav) , मुंबईच्या इतर फलंदाजांनीही हैदराबादच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुशीर खानने 24 चेंडूंत 51 धावांची उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली, ज्यामध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. याशिवाय, सलामीवीर अंगकृष रघुवंशीने 13 चेंडूंत 27 धावा केल्या, तर यष्टीरक्षक हार्दिक तामोरेने 16 चेंडूंत 22 धावांचे योगदान दिले. शेवटी, शिवम दुबेने 5 चेंडूंत नाबाद 13 धावा केल्या ज्यात दोन षटकारांचा समावेश होता आणि मुंबईला 41 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला.
अहिल्यानगरमध्ये रिलायन्स स्मार्ट बाजार घरफोडीचा गुन्हा उघडकीस ; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई-
तर दुसरीकडे शिवम दुबेने गोलंदाजीतही आपली छाप पाडली. त्याने आपल्या 4 षटकांत 31 धावा देऊन 2 विकेट्स घेतले. दरम्यान, मॅक्सवेल स्वामीनाथनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले. साईराज पाटीलनेही 2 विकेट्स मिळवले, तर शार्दुल ठाकूरने एक विकेट मिळवला.
