अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; 4 खेळाडू बाहेर?

India vs Afghanistan :  श्रीलंका दौऱ्यानंतर आता भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.

India Vs Afghanistan

India Vs Afghanistan

India vs Afghanistan :  श्रीलंका दौऱ्यानंतर आता भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. 13 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या मालिकेसाठी नुकतंच भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघात स्टार खेळाडू संजू सॅमसनचा देखील पुनरागमन झालं आहे. तर दुसरीकडे जसप्रीत बुमराह देखील भारतीय संघात दिसणार आहे. मात्र भारतीय संघात जसप्रीत बुमराहसह चार खेळाडू या मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध (India vs Afghanistan) होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघात सात खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे.मात्र बुमराह, नितीश रेड्डी, सुंदर आणि राणा यांच्या फिटनेसवर आता देखील प्रश्नचिन्ह कायम आहे. निवडकर्त्यांनी या चार खेळाडूंना संघात स्थान दिले असले तरी, त्यांच्या उपलब्धतेचा निर्णय त्यांच्या फिटनेसवर अवलंबून राहणार आहे. जर हे खेळाडू वेळेवर फिट होऊ शकले नाहीतर निवडकर्त्यांनी या चार खेळाडूंना संघात स्थान दिले असले तरी त्यांच्या उपलब्धतेचा निर्णय त्यांच्या फिटनेसवर अवलंबून आहे.  जर ते वेळेत तंदुरुस्त होऊ शकले नाहीत तर ते संपूर्ण मालिकेला मुकू शकतात.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी*, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह*, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर*, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि हर्षित राणा*. ( * – फिटनेस क्लिअरन्स नाही)

13 सप्टेंबरपासून सुरू होणार मालिका 

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना 13 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. दुसरा सामना 15 सप्टेंबरला आणि तिसरा सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. मालिकेतील सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जातील आणि प्रत्येक सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता सुरू होईल. या मालिकेचे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड  यजमानपद भूषवत आहे.

अन्न सुरक्षा म्हणजे शिक्षा नाही; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर FSSAI प्रमुख स्पष्टच बोलले

पहिला टी20 सामना – 13 सप्टेंबर

दुसरा टी20 सामना – 15  सप्टेंबर

तिसरा टी20 सामना – 17 सप्टेंबर

Exit mobile version