Download App

पराभव बांगलादेशचा पण, धक्का इंग्लंडला; डीफेंडींग चॅम्पियनचं जुनं रेकॉर्ड कांगारूंनी मोडलं

बांग्लादेश विरुद्धच्या विजयासह ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाचे एक जुने रेकॉर्ड मोडीत काढले. तसेच आणखी काही रेकॉर्ड केले.

T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीचे (T20 World Cup 2024) सामने सुरू आहेत. या सामन्यात काल ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशचा (AUS vs BAN) पराभव केला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलिया संघाला 28 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. कर्णधार पॅट कमिन्सने हॅट्ट्रिक (Pat Cummins) घेत बांग्लादेशच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. अडम झाम्पा, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस यांनीही विकेट घेत कमिन्सला साथ दिली. या सामन्यात विजयासह ऑस्ट्रेलियाने आणखीही काही रेकॉर्ड आपल्या नावे केले. या दरम्यान ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाचे (England) एक जुने रेकॉर्ड मोडीत काढले.

या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बांग्लादेशला फलंदाजी करावी लागली. फलंदाजीत त्यांचे फलंदाज मात्र कांगारू संघाच्या गोलंदाजी समोर ढेपाळले. बांग्लादेशला 20 ओव्हर्समध्ये फक्त 140 रन करता आले. यानंतर ऑस्ट्रेलियाने 11.2 ओव्हर्समध्ये दोन बाद 100 रन केले होते. त्याचवेळी जोरदार पावसाला सुरूवात झाली यानंतर मात्र सामना सुरू करता आला नाही.

ऑस्ट्रेलियाचा ‘पाणी’दार विजय! वॉर्नर-कमिन्स चमकले, पराभवाने बांग्लादेशची वाट बिकट

पंचांनी डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 28 धावांनी विजयी घोषित केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. टी 20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा हा सलग आठवा विजय आहे. फेब्रुवारी 2024 ते जून 2024 या काळात ऑस्ट्रेलियाने सलग आठ विजय मिळवले आहेत. याबाबतीत ऑस्ट्रेलियाने स्वतः च्याच रेकॉर्डची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या काळात सलग आठ सामने जिंकले होते.

यानंतर ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तान (AUS vs AFG) बरोबर दोन हात करावे लागणार आहेत. या सामन्यातही कांगारू संघ आपलेच रेकॉर्ड मोडू शकतो. सलग नऊ विजय मिळवून नवे रेकॉर्ड करू शकतो. अफगाणिस्तानने सुपर 8 फेरीतील पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवायचे असेल तर त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.

विंडीजचा कहर! अमेरिकेवर दणदणीत विजय; होपसमोर गोलंदाजांची शरणागती

इंग्लंडला पछाडले

टी 20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचा हा सलग आठवा विजय आहे. याबाबतीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला मागे टाकले आहे. इंग्लंडने 2010 ते 2012 या काळात टी 20 वर्ल्डकपमध्ये सलग सात सामने जिंकले होते. तर ऑस्ट्रेलियाने 2022 ते 2024 या दोन वर्षांच्या काळात टी 20 क्रिकेटमध्ये सलग आठ सामने जिंकले आहेत. भारतीय संघ याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियानेही सलग सात सामने जिंकले आहेत. सन 2012 ते 2014 या काळात भारताने सलग सात सामने जिंकले होते.

follow us