T20 World Cup 2026 पाकिस्तानच्या अडचणी वाढणार, आणखी एक सामना होणार रद्द

T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. मात्र या स्पर्धेत पाकिस्ताने

T20 World Cup 2026

T20 World Cup 2026

T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. मात्र या स्पर्धेत पाकिस्ताने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. जर हा सामना रद्द झाला तर भारताला दोन गुण मिळणार आहे. तर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जर पाकिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिला तर त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे कारण त्यांचा आणखी एक सामना रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तान या स्पर्धेच्या सुपर 8 मधून बाहेर होऊ शकतो.

पाकिस्तान, भारत, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्ससह टी20 विश्वचषक 2026 च्या गट अ मध्ये आहे. पाकिस्तान पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होण्याची शक्यता नाही आणि तो रद्द होण्याची शक्यता आहे. 4 फेब्रुवारी रोजी या मैदानावर पाकिस्तानला सराव सामना खेळायचा होता मात्र पावसामुळे सराव सामना रद्द झाला. जर पावसाने या सामन्यात व्यत्यय आणला तर सुपर 8 मध्ये जाण्याचा पाकिस्तानचा मार्ग खूप कठीण होईल.

पाकिस्तानसाठी हवामान चांगले नाही. संपूर्ण आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आठवड्याच्या शेवटी वादळाची शक्यता आहे. पाकिस्तानचा पहिला सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता होणार आहे, तर दुपारी 12 वाजता पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर हा सामना रद्द झाला तर पाकिस्तानचे फक्त दोन सामने शिल्लक राहतील. यापैकी एक सामना 2024 च्या टी20 विश्वचषकात त्यांना पराभूत करणाऱ्या संघाविरुद्ध अमेरिकेविरुद्ध आहे. त्यानंतर त्यांचा तिसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध असेल. जर पाकिस्तानचा पहिला सामना खराब झाला आणि सामना रद्द झाला आणि नंतर पाकिस्तान भारताविरुद्ध खेळला नाही, तर अमेरिकेविरुद्धचा सामना पुन्हा एकदा पाकिस्तानसाठी निर्णायक ठरेल. पाकिस्तानचा पराभव किंवा पाऊस यासारख्या खराब निकालामुळे पाकिस्तान टी20 विश्वचषकातून बाहेर पडेल.

‘द वॉशिंग्टन पोस्ट’ ने शशी थरूर यांच्या मुलासह 300 जणांना कामावरुन काढले; कारण काय? 

जर 7 फेब्रुवारीचा सामना पावसामुळे रद्द झाला तर पाकिस्तान भारताविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेऊ शकते. बांगलादेशला पाठिंबा दिल्यामुळे पाकिस्तानने टी20 विश्वचषकात भारताविरुद्ध खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. हा सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे खेळवण्यात येणार होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्ये तटस्थ ठिकाणी खेळण्याचा करार झाला होता, परंतु पाकिस्तान या कराराचे उल्लंघन करत आहे. आयसीसीने पाकिस्तानला इशारा दिला आहे, परंतु अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

Exit mobile version